बरेली हिंसाचार: मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान पोलिसांच्या ताब्यात!

आतापर्यंत ५५ जणांना अटक, यापैकी आज २८ जणांना अटक 

बरेली हिंसाचार: मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान पोलिसांच्या ताब्यात!

उत्तर प्रदेशच्या बरेलीतील ‘I Love Muhammad’ वाद आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलीस कारवाईला वेग आला आहे. बरेलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) अनुराग आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेत त्याने पोलिसांकडून हिसकावून घेतलेला मोबाईल हँडसेट पोलिसांनी जप्त केला आहे.

दुसरा आरोपी जफरुद्दीन यालाही अटक करण्यात आली असून, त्या हिंसाचारात वापरण्यात आलेली शस्त्रसुद्धा त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संदेश मिळाल्याचे कबूल केले आहे, ज्यात त्यांना ठराविक ठिकाणी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते.

हे ही वाचा : 

लेहमधील अशांततेचा लडाख पर्यटनाला फटका!

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा: परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!

भारत आमचा बाप होता आणि नेहमीच राहील…

“देशाचे नेते फ्रंटफूटवर फलंदाजी करतात तेव्हा…” मोदींबद्दल काय म्हणाला सूर्यकुमार?

नदीम खानने कबूल केले की, त्याचे, डॉ. नफीस आणि लियाकत यांचे सहस्वाक्षरीत एक अपील लेटरहेडवर प्रसिद्ध करण्यात आले होते. यासंदर्भात पोलिसांचा लियाकतचा शोध सुरू आहे. मात्र, नदीम खानने नंतर अपीलवरील सह्या आपल्याच्या नसल्याचे सांगत जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही पोलिसांनी दिली. एसएसपी बरेली अनुराग आर्य पुढे म्हणाले, “या घटनेत आतापर्यंत आम्ही एकूण ५५ जणांना अटक केली आहे. लवकरच आणखी अटक केली जाईल.”

Exit mobile version