ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सुंदरपाडा परिसरात २७ जानेवारी रोजी झालेल्या भीषण स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या स्फोटाची तीव्रता आणि भीषणता स्पष्ट झाली आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एक महिला दगावली असून तिचा मुलगा आणि कुख्यात गुंड शाहनवाझ मलिक यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
फुटेजमध्ये निवासी इमारतीच्या छतावर बसवलेल्या पाण्याच्या टाक्यांमागून अचानक आगीचा मोठा भडका उडताना दिसतो. त्यानंतर आकाशात दाट धुराचे लोट पसरताना दिसतात. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरात धक्के बसले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मोठा आवाज ऐकून अनेक रहिवासी घाबरून घराबाहेर धावले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छतावर स्फोटक साहित्य हाताळताना हा स्फोट झाल्याची शक्यता आहे. चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरुवातीला कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. काही दिवसांनी एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
आरबीआयच्या कडक कर्ज नियमांचा शेअर बाजाराला फटका
एसआयआरमध्ये घोळ; बंगालमध्ये सात अधिकाऱ्यांना हाकलले
अणुकरारासाठी इराणचा मोठा प्रस्ताव
बेकायदेशीर बॉम्बनिर्मितीचा तपास
भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शहनवाज मलिक याची ओळख पटवली आहे. तपास यंत्रणा या घटनेकडे बेकायदेशीर बॉम्बनिर्मितीच्या दृष्टीकोनातून पाहत आहे.
प्राथमिक तपासात शहनवाज मलिक, त्याचा सहकारी अमिया मलिक, त्याची आई आणि आणखी एक साथीदार हे घरात स्फोटके तयार करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून दारूगोळा जप्त करण्यात आला असून त्यामुळे बॉम्बनिर्मितीच्या शक्यतेला बळ मिळाले आहे.
“मुख्य जखमी व्यक्तीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास आहे. ते काही गुन्हेगारी कृत्याची योजना आखत होते आणि त्यासाठी बॉम्ब तयार करत असावेत. स्फोटक बनवताना चार जण जखमी झाले,” असे पोलीस उपायुक्त जगमोहन मीणा यांनी सांगितले. तसेच परिसरात साठवलेली इतर स्फोटके आहेत का, यासाठी शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी शहनवाज मलिकविरुद्ध पूर्वीही गुन्हे दाखल असल्याची पुष्टी केली आहे.
एनआयएकडून तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते; मात्र नंतर केंद्रीय यंत्रणेने तपास ताब्यात घेतला.
अधिकारी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करत असून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. स्फोटाचे नेमके कारण काय होते आणि यामागे मोठा कट होता का, याचा तपास सुरू आहे. तपास सुरू असताना सुंदरपदा आणि परिसरात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
