ख्रिसमसच्या दिवशी पाद्रीने अल्पवयीन मुलीचा केला बलात्कार

धर्मांतर केल्याची तक्रार, छत्तीसगडमधील घटना

ख्रिसमसच्या दिवशी पाद्रीने अल्पवयीन मुलीचा केला बलात्कार

छत्तीसगडमधून हिंदू मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सूरजपूर जिल्ह्यातील प्रतापपूर पोलीस ठाणे परिसरातील हे प्रकरण असून यासंबंधी एका ख्रिश्चन पाद्रीला अटक करण्यात आली आहे. तसेच पाद्रीसह त्याचे वडील आणि पत्नीला देखील अटक करण्यात अली आहे.

माहितीनुसार, एका अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि लैंगिक शोषण केल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ख्रिश्चन पाद्री राजकुमार, त्याचे वडील खैरू रामखेलावान आणि त्याची पत्नी सुनीता यांना अटक केली आहे. पाद्री राजकुमार हा स्थानिकांच्या घरी जाऊन त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत असे, अशी माहिती समोर आली आहे. त्याने आपल्या प्रभावाचा वापर करून पीडितेच्या संपूर्ण कुटुंबाचे धर्मांतर केले. ख्रिसमसच्या दिवशी (२५ डिसेंबर) अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपी पीडितेच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचारात सहभागी असल्याचे आढळून आले.

हे ही वाचा:

आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडू नको, भाजपा खासदाराचाही सवाल

“ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या धाडसी कारवाईचे कौतुक…” मीर यार बलोच यांनी पत्रात काय म्हटले?

“आपले शेजारी वाईट आहेत” पाकिस्तानबद्दल एस जयशंकर काय म्हणाले?

२११ तळीरामांवर गुन्हे, तर १३ हजार चालकांवर कारवाई

पीडितेच्या बेपत्ता होण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. सूरजपूरचे पोलिस अधीक्षक प्रशांत ठाकूर यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन हाऊस ऑफिसर अमित कौशिक यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने पीडितेचा शोध सुरू केला आणि राजपूर पोलिस स्टेशन परिसरातील धांधपूर गावातून तिची सुटका केली. तिच्या सुरक्षेसाठी तिला अंबिकापूर येथील सखी सेंटरमध्ये पाठवण्यात आले. पाद्री राजकुमारवर राजपूर पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय, त्याचे अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. पोलिसांनी सांगितले की आरोपी एका मोठ्या नेटवर्कशी जोडलेले आहेत आणि लवकरच या प्रकरणात आणखी अटक होऊ शकते.

Exit mobile version