खरातचा काळा पैसा उघड होणार!

व्यवहारांवर EDची नजर, फडणवीसांचा इशारा

खरातचा काळा पैसा उघड होणार!

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. आता या प्रकरणाला मोठे वळण मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला आहे – “खरातच्या प्रत्येक व्यवहाराची ईडी चौकशी करेल.” त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक घोटाळे उघड होण्याची शक्यता वाढली आहे. अशोक खरातवर आधीच महिलांच्या शोषणाचे, फसवणुकीचे आणि गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून विशेष तपास पथक (SIT) सखोल चौकशी करत आहे. मात्र आता केवळ गुन्हेगारी नाही, तर पैशांचा मागोवा घेण्यावरही सरकारने भर दिला आहे.
हे ही वाचा:
टँक फुल, पण खिसा रिकामा! हाँगकाँगमध्ये पेट्रोल दरांचा स्फोट

ट्रम्पच्या युद्धाच्या निर्णयाने अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर

पश्चिम आशियातील संघर्ष लांबला तर भारताच्या निर्यातीवर परिणाम!

मुंबईत आज ‘स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान’ बैठकीचे आयोजन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “खरातने कमावलेला पैसा, मालमत्ता, जमीन व्यवहार – सगळे तपासले जाईल. काहीही बेकायदेशीर आढळले तर कडक कारवाई होणारच.” त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणात मोठे आर्थिक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल १२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा वेगाने काम करत असून दररोज नवे धक्कादायक तपशील बाहेर येत आहेत. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) लीक झाल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. यावर फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत, “अशा गोपनीय माहितीचा गैरवापर सहन केला जाणार नाही. CDR लीक प्रकरणाचीही चौकशी होईल,” असे ठणकावून सांगितले. सरकारने या प्रकरणात कोणतीही सवलत न देण्याचा निर्धार दर्शवला आहे. “राजकारणासाठी हा विषय वापरू नका, सत्य बाहेर येऊ द्या,” असेही फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

एकूणच, अशोक खरात प्रकरण आता फक्त गुन्हेगारीपुरते मर्यादित राहिलेले नाही. काळा पैसा, बेकायदेशीर व्यवहार आणि प्रभावशाली संबंध यांचा गुंता उलगडण्याच्या दिशेने तपास सुरू आहे. ईडीच्या एंट्रीमुळे हे प्रकरण आणखी मोठे होणार, यात शंका नाही.

Exit mobile version