एकत्र राहण्यास पत्नीचा नकार ; पवईत पतीने वकिल पत्नीची केली हत्या

पोलिसांची दिशाभूल करण्याचा केला प्रयत्न

एकत्र राहण्यास पत्नीचा नकार ; पवईत पतीने वकिल पत्नीची केली हत्या

पवईत राहणाऱ्या ५६ वर्षीय वकिल महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकत्र नांदण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने तोंडावर उशी दाबून पत्नीचा जीव घेतला.

मृत महिला सावित्रीदेवी चंद्रभान (५६) अशी आहे. ती पतीपासून वेगळी राहात होती. मात्र पती राजीव पुन्हा एकत्र राहण्याचा तगादा लावत होता. रविवारी तो सावित्रीच्या पवईतील रहेजा संकुलातील घरी गेला. पुन्हा एकदा एकत्र राहण्याबाबत दोघांत वाद झाला. सावित्रीने नकार दिल्यावर संतापलेल्या राजीवने उशीने तोंड दाबून तिची हत्या केली.

दरम्यान, सावित्री घरी बेशुद्धावस्थेत आढळल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. श्वास गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच पवई पोलिसांनी तपास सुरू केला.

हे ही वाचा:

बरेली हिंसाचार: मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान पोलिसांच्या ताब्यात!

लेहमधील अशांततेचा लडाख पर्यटनाला फटका!

“ओवैसी बंधू कोल्हापुरात नकोत”

भारत ते भूतान रेल्वे प्रवास लवकरच! ४,०३३ कोटी रुपयांची गुंतवणूक

सुरुवातीला राजीवने हत्येशी काही संबंध नसल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सखोल चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. राजीव चंद्रभानला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पवई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version