जम्मू आणि काश्मीर: हंडवाऱ्यात तीन दहशतवादी साथीदारांना अटक!

संयुक्त कारवाईत पोलिस, लष्कर आणि CRPF ला मोठे यश

जम्मू आणि काश्मीर: हंडवाऱ्यात तीन दहशतवादी साथीदारांना अटक!

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा खात्मा करण्यात गुंतलेल्या लष्कराने मोठी कारवाई केली आहे. जम्मू-कश्मीरमधील हंडवाऱ्याच्या कलामाबाद येथील वजिहामा परिसरात, पोलिस, लष्कर आणि CRPF च्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून शस्त्रास्त्रे व देशविरोधी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मोहम्मद इक्बाल पंडित, सजाद अहमद शहा, इश्फाक अहमद मलिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहशतवाद्यांच्या या साथीदारांकडून १ पिस्तुल, १ पिस्तुल मॅगझीन, २ पिस्तुल राउंड्स, २० राउंड्स ७.६२ मिमीचे जीवंत काडतुसे, ११ देशविरोधी पोस्टर्स जप्त केले आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे केली असून, यामुळे परिसरातील संभाव्य दहशतवादी हालचालींना मोठा आळा बसला आहे. पोलिस तपास अधिक गतीने सुरू असून, या कारवाईमुळे हंडवारा परिसरात शांतता राखण्यात मदत होईल, असा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील एका जंगलातून बुधवारी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी अवुरा येथे शोध मोहीम सुरू केली आणि त्यात चार यूबीजीएल ग्रेनेड, तीन पाकिस्तानी बनावटीचे हँडग्रेनेड, एक चिनी पिस्तूल, एक आयईडी आणि उर्दूमध्ये पाकिस्तानी पत्ता लिहिलेली एक हँड बॅग यासह मोठा शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. सुरक्षा दलांनी ब्राऊन शुगर असल्याचा संशय असलेल्या १६ पॅकेट देखील जप्त केल्या आहेत. 

Exit mobile version