आठवड्याच्या पहिल्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावेळी धक्कादायक प्रकार घडल्याची बाब उघडकीस आले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सरन्यायाधीशांवरील संताप व्यक्त करण्यासाठी त्याने ही कृती केल्याचे उघड झाले आहे. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान साधत या वकिलाला अडवलं आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावेळी या वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशा आशयाच्या घोषणा देखील दिल्या.
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान साधत या वकिलाला अडवलं. हा वकील सरन्यायाधीशांवरील संताप व्यक्त करत त्यांच्याजवळ पोहोचला. त्यानंतर तो बूट काढू लागला. तो बूट फेकून मारणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि बाहेर नेलं. आरोपीला कोर्टरूममधून बाहेर काढले जात असताना, तो म्हणाला की, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.
मध्य प्रदेशातील जीर्ण झालेल्या विष्णू मूर्तीच्या जीर्णोद्धाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. यावरून टीकाही झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली. घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले, तर मुख्य न्यायाधीश गवई शांत राहिले आणि त्यांनी आपले कामकाज सुरू ठेवले. या घटनेनंतर, त्यांनी टिप्पणी केली की, या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. सुनावणी सुरू ठेवा.
हे ही वाचा:
बोरिवलीमध्ये ब्रह्मविद्येचे ऑफलाईन वर्ग
दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर कटकमध्ये कर्फ्यू
“गाझामधील शांतता योजनेला आणखी विलंब झाल्यास…” ट्रम्प यांनी काय इशारा दिला?
‘चार वेळा दहशतवाद्यांना भेटलो’
सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित पांडे यांनी म्हटले की, हे कृत्य सरन्यायाधीशांच्या देवत्वाच्या टीकेला प्रतिसाद म्हणून केले गेले आहे असे वाटते. पण, मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची विनंती करतो, असे ते म्हणाले.
सप्टेंबरमध्ये, मध्य प्रदेशातील जावरी मंदिरातील ७ फूट उंचीच्या विष्णू मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळताना, मुख्य न्यायाधीश गवई यांनी याचिकाकर्त्याला सांगितले की, ही प्रसिद्धी हिताची याचिका आहे. जा आणि देवतेलाच आता काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. म्हणून आता जा आणि प्रार्थना करा. यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर सरन्यायाधीश म्हणाले की ते सर्व धर्मांचा आदर करतात.
