अल कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलची मुख्य हस्तक शमा परवीनला बेंगळुरूत अटक 

गुजरात एटीएसची कारवाई

अल कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलची मुख्य हस्तक शमा परवीनला बेंगळुरूत अटक 

गुजरात अ‍ॅन्टी-टेररिझम स्क्वॉड (ATS) ने भारतीय उपखंडातील अल-कायदा (AQIS) शी संलग्न असलेल्या दहशतवादी मॉड्यूलच्या मुख्य षड्यंत्रकर्त्याला अटक केली आहे. शमा परवीन (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तिला बंगळुरू, कर्नाटक येथून अटक करण्यात आली.

शमा परवीन कोण आहे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमा परवीनच हे संपूर्ण दहशतवादी मॉड्यूल कर्नाटकमधून चालवत होती आणि तीच प्रमुख हँडलर होती. ती अल कायदा मॉड्यूलच्या दहशतवादी हालचाली समन्वयित करत होती. २३ जुलै रोजी चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. वय २० ते २५ दरम्यान असलेले हे संशयित गुजरात, दिल्ली आणि नोएडा येथून अटक करण्यात आले. अटक झालेल्यांची नावे मोहम्मद फार्दीन, सैफुल्ला कुरेशी, झीशान अली, मोहम्मद फैय्याज अशी आहेत. हे सर्व सोशल मिडिया अ‍ॅपवरून एकमेकांशी संपर्कात होते आणि त्यांना भारतभरातील महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचे आदेश दिले गेले होते.

हे ही वाचा:

‘भाई वीरेंद्र तो मोहरा है, लालू यादव असली चेहरा हैं’

सपा कार्यकर्त्यांनी मौलाना रशिदीना थोबडवले!

प्रणिती शिंदे म्हणतात, ऑपरेशन सिंदूर म्हणजे सरकारचा मीडियातला तमाशा

आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टर झोपले, रुग्णाचा मृत्यू!

आंतरराष्ट्रीय संबंध आणि कारवायांचे उद्दिष्ट:

याच मॉड्यूलचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत. संशयितांनी भारताबाहेरील हँडलर्सशी संपर्क साधला असल्याचेही तपासात समोर आले आहे. प्रमुख ठिकाणी हल्ल्यांची योजना तयार केली जात होती.

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल काय सांगतो?

गुजरात ATS च्या अलीकडील अ‍ॅक्शनमुळे अल कायदाच्या भारतातील नेटवर्कबाबत गंभीर बाबी समोर आल्या आहेत. शमा परवीनसारखी महिला दहशतवादी मॉड्यूलचा कणा असल्याचे स्पष्ट झाल्याने सुरक्षा यंत्रणांसाठी ही बाब अधिक चिंतेची ठरत आहे.

Exit mobile version