मैसूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचा कोडवर्ड होता, शर्टचा फोटो!

ड्रग्ज प्रकरणात गुप्तचर विभागाची एन्ट्री, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा संशय

मैसूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचा कोडवर्ड होता, शर्टचा फोटो!

कर्नाटकातील मैसूर येथे उघडकीस आलेल्या ४३४ कोटी रुपयांच्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात साकीनाका पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रग्ज पुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोडवर्डबाबत पोलिसांनी महत्त्वाचा खुलासा केला असून, आरोपी कर्नाटकातून महाराष्ट्रात एमडी ड्रग्ज पोहोचवण्यासाठी ‘शर्टचा फोटो’ हा कोडवर्ड वापरत असल्याचे समोर आले आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ही फॅक्टरी दोन वेगवेगळ्या गटांकडून चालवली जात होती. एक गट ड्रग्ज तयार करण्याचे काम करत होता, तर दुसरा गट त्याच्या पुरवठ्याची जबाबदारी सांभाळत होता. विशेष म्हणजे, या दोन्ही गटातील सदस्य एकमेकांना ओळखत नव्हते. हा त्यांचा सुरक्षित व्यवहार करण्याचा ‘मोडस ऑपेरेंडी’ होता.

शर्टाच्या रंगावरून ओळख पटवली जात असे

फॅक्टरीत एमडी ड्रग्ज तयार झाल्यानंतर, मुंबईतील गँगचा एक सदस्य बसने बेंगळुरूला रवाना होत असे. त्याच वेळी मैसूरमधील दुसरा व्यक्ती ड्रग्ज घेऊन बेंगळुरूकडे येत असे. ओळख पटवण्यासाठी बेंगळुरूत ड्रग्ज घेण्यासाठी आलेला सदस्य आपल्या शर्टचा फोटो व्हॉट्सअपवर पाठवत असे. त्या फोटोच्या आधारे मैसूरहून आलेला पुरवठादार त्याला ड्रग्ज सुपूर्द करत असे. त्यानंतर तो व्यक्ती बसने मुंबईला परत येत असे.

हे ही वाचा:

भारतीय युद्धनौकांनी फिलिपिन्सच्या नौदलासोबत केला सराव

महादेवी हत्तिणीला परत आणण्यासाठी फडणवीसांनी उचललं हे पाऊल!

एमसीडी अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना पकडले

प्रियांका गांधी म्हणतात, ‘खरे भारतीय कोण? हे न्यायालय ठरवू शकत नाही’

मुंबईत विविध भागांमध्ये पुरवठा

मुंबईत ड्रग्ज पोहोचल्यावर ती विविध पुरवठादारांमार्फत शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केली जात असे. पोलिसांच्या माहितीनुसार, विश्नोई गँगदेखील याच पद्धतीने शस्त्रास्त्रांची सप्लाय करत होती, जिथे फक्त शर्टच्या फोटोद्वारे ओळख पटवली जात असे आणि व्यवहार पूर्ण केला जात असे. गँगचे सदस्य प्रत्यक्षात एकमेकांना कधीच ओळखत नसत.

तपासातून उघड झाले आहे की ड्रग्ज कर्नाटकातून मुंबईत रस्त्यानेच आणली जात होती. प्रत्येक वेळी गँगचा सदस्य मुंबईहून बेंगळुरूला जाऊन ड्रग्ज घेऊन परत येत असे. पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी गुप्तचर विभागाकडून (आईबी) सुरू झाली असून, सोमवारी आयबी अधिकाऱ्यांनी अटक आरोपींची तासन्‌तास चौकशी केली.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशयुग

गुप्तचर विभागाला शंका आहे की ही ड्रग्ज फॅक्टरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या रॅकेटचा भाग असू शकते आणि यात अंडरवर्ल्ड चा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयबीने तपासाची व्याप्ती वाढवली असून, या प्रकरणातील आणखी धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version