बंगालमध्ये पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण करून केले ठार : भाजपाने व्हिडिओ केला शेअर!

पोलिसांवर कारवाई न केल्याचा आरोप

बंगालमध्ये पुजाऱ्याच्या मुलाला मारहाण करून केले ठार : भाजपाने व्हिडिओ केला शेअर!

पश्चिम बंगालमध्ये एका पुजाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली. मृताचे नाव रामचंद्र घोषाल असे आहे. त्याचे वडील कामरपुकुर येथील रामकृष्ण मिशनच्या रघुवीर मंदिराचे पुजारी होते. बंगाल भाजपच्या एक्स अकाउंटवरून या घटनेची माहिती देण्यात आली.

ट्विटमध्ये लिहिले आहे की, “श्री रामकृष्ण परमहंसांच्या आईच्या कुटुंबातील एका वंशजाची मारहाण करून हत्या करण्यात आली. कामरपुकुर येथील रामकृष्ण मंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा रामचंद्र घोषाल यांची रामकृष्ण मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हत्या करण्यात आली.”

भाजपने आरोप केला आहे की, घोषाल यांची तृणमूल काँग्रेस नेते जगबंधू घोष यांनी आयोजित केलेल्या उत्सवाजवळ पोलिस ठाण्यापासून थोड्या अंतरावर सार्वजनिकरित्या मारहाण करून हत्या करण्यात आली. भाजपने या कृत्यासाठी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ला जबाबदार धरले आणि म्हटले की, राज्य पोलिस पोलिस ठाण्याच्या इतक्या जवळ हिंदू आणि त्यांच्या कुटुंबांचे संरक्षण करू शकत नाहीत.

भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेबद्दल सांगितले की, धार्मिक स्थळावरील ही अमानवीय घटना संपूर्ण राज्यासाठी लाजिरवाणी आहे. या प्रकरणात पोलिसांची निष्क्रियता स्पष्टपणे दर्शवते की गुन्हेगारांना सरकार संरक्षण देत आहे. दरम्यान, या घटनेवरून संताप व्यक्त केला जात असून आरोपींना अटक करून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

 

Exit mobile version