हिंदू तरुणाशी लग्न करणाऱ्या वधूच्या तोंडून निघाले ‘या अल्लाह’

पिडीत तरुणाकडून तक्रार दाखल 

हिंदू तरुणाशी लग्न करणाऱ्या वधूच्या तोंडून निघाले ‘या अल्लाह’

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये नाझियाने निकिता असल्याचे भासवून एका हिंदू तरुणाशी लग्न केले. वधू तिच्या सासरच्या घरी पोहोचताच तिने ‘या अल्लाह’ असे उच्चारले आणि तिची मुस्लिम ओळख उघड झाली. यानंतर, वधू घरातून रुपये तीन लाख आणि घरातील सामान लुटून पळून गेली. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांधी नगर पोलीस स्टेशन परिसरातील हिंगोनिया खुर्द गावातील एका तरुणाच्या लग्नासाठी कुटुंबीय जोडीदार शोधत होते. दरम्यान, पिडीत तरुणाच्या भावाची मुकेश मराठा आणि कोमल पठाणशी भेट झाली. कोमल पठाणने लग्नासाठी रुपये २.५ लाख घेऊन निकिता नावाच्या मुलीशी लग्न लावून दिले. त्यावेळी मुलगी अविवाहित आणि ब्राह्मण समाजातील असल्याचे सांगण्यात आले. 

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्याचे २६ फेब्रुवारी २०२५ रोजी निकितासोबत लग्न झाले. काही काळानंतर निकिताचे नाव नाजिया असल्याचे उघड झाले. त्यानंतर कोमल पठाण तिला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करण्यासाठी घरून घेऊन गेली, परंतु तीन दिवसांनी नाजिया परत घरी आली.

हे ही वाचा : 

Russia Earthuquake: कुठे आणि कधी आहे त्सुनामीचा खतरा

अल कायदाच्या दहशतवादी मॉड्यूलची मुख्य हस्तक शमा परवीनला बेंगळुरूत अटक 

बंद कारखान्यात होत होती गोहत्या, २१० किलो गोमांस सापडले!

अमेरिका-भारत व्यापार करार अद्याप अंतिम नाही, २५ टक्के कर लादणार!

त्यानंतर पीडित तरुणाला शाहनवाज उर्फ शानूचा फोन आला, त्याने स्वतःची ओळख नाजियाचा पती म्हणून करून दिली आणि ५ वर्षांचे मूल असल्याचेही सांगितले. त्यानंतर नाजिया घरातून पळून गेली. दरम्यान, पिडीत तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

Exit mobile version