उत्तराखंडमधील हल्दवानी दंगलीचा मास्टरमाइंड अब्दुल मलिकला अटक

अनधिकृत मदरसा उद्ध्वस्त केल्यावर झाली होती दंगल

उत्तराखंडमधील हल्दवानी दंगलीचा मास्टरमाइंड अब्दुल मलिकला अटक

उत्तराखंडमधील हल्दवानी येथे अनधिकृत मदरसा पाडल्यामुळे उसळलेल्या दंगलीचा मास्टरमाईंड अब्दुल मलिक याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. उत्तराखंड पोलिसांनी दिल्लीतून त्याला अटक केली. आता पर्यंत या प्रकरणात ८० जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, मलिक आणि त्याची बायको साफिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे नाव पुढे करून या दोघांनी जमीन ताब्यात घेतली होती आणि तिथे बांधकाम केले होते. प्रशासनाची फसवणूक करण्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

या दोघांवर १२०बी (कट रचणे), ४१७ (फसवणूक), ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणा) ही कलमे लावण्यात आली आहेत. याआधी, हल्दवानी प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी ७८ जणांना अटक केली होती आता ही संख्या ८० झाली आहे.

हे ही वाचा:

बारामतीत होणार नणंद आणि भाऊजय यांच्यात लढत

आरबीआयकडून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांना पीपीआय जारी करण्याची बँकांना परवानगी

‘महानंद’वरून पुन्हा विरोधकांची आग पाखड

मुख्यमंत्री शिंदेंना धमकीचा संदेश देणाऱ्याला पुण्यातून घेतले ताब्यात

पोलिसांनी अब्दुल मलिक आणि त्याचा मुलगा अब्दुल मोईद यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. मलिकने हा अनधिकृत मदरसा बांधला होता आणि तो पाडण्यास त्याने विरोध केला होता. हा मदरसा पाडण्यासाठी पालिकेने जी नोटीस दिली होती, त्याला सफियाने विरोध केला होता आणि त्यासाठी तिने न्यायालयात धाव घेतली होती.

८ फेब्रुवारीला हल्दवानी येथे ही दंगल झाली होती. हा मदरसा हटवल्यावर स्थानिकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. शिवाय, पेट्रोल बॉम्बही टाकण्यात आले. त्यामुळे अनेक पोलिस जखमी झाले होते. त्यांनी पोलिस ठाण्याचा आसराही घेतला होता. मात्र जमावाने पोलिस ठाण्यालाही आग लावली.
ही दंगल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यात एक एनजीओ अडकली जिच्या माध्यमातून या दंगलीसाठी लोकांना भडकवण्याच काम केले गेले.

Exit mobile version