आंदोलनाचा उचलला फायदा; फोर्टमध्ये कपड्याच्या दुकानात घरफोडी

सीसीटीव्हीत सगळी घटना कैद

आंदोलनाचा उचलला फायदा; फोर्टमध्ये कपड्याच्या दुकानात घरफोडी

आझाद मैदान परिसरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा बंदोबस्तात गुंतलेली असताना चोरट्यांनी संधी साधली. फोर्ट परिसरातील एका कपड्याच्या दुकानाचे शटरचे टाळे तोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

अंधेरी येथील रहिवासी अमित गाला यांचे फोर्ट परिसरातील रघुनाBथ दादाजी स्ट्रीट, जेबी हाऊस येथील दुकान शनिवारी रात्री बंद करून ते गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दुकान उघडले असता शटरचे टाळे तुटलेले आढळले. दुकानातून सुमारे सहा हजार रुपयांची रोकड आणि कपडे लंपास झाल्याचे दिसून आले. याशिवाय शेजारच्या दुकानाचे टाळे देखील तोडण्यात आले होते.

हे ही वाचा:

मराठा आंदोलन: उद्या ४ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश!

डीआयआय समभागांमध्ये ५ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक

कृषी अवजारांच्या आडून बनत होती शस्त्रे !

  1. राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ फसली

घटनास्थळावरील सीसीटीव्हीत काही इसम हातात भगवे गमचे घेत दुकानात शिरलेले दिसून आले. त्यामुळे हे चोरटे नेमके कोण आहेत आणि त्यांनी आंदोलकांच्या गर्दीत मिसळण्यासाठी भगव्या गमच्याचा आधार घेतला का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी अमित गाला यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

Exit mobile version