वडाळा टीटीत तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहास कुटुंबीयांचा विरोध

वडाळा टीटीत तरुणीची आत्महत्या

मुंबईच्या वडाळा टीटी परिसरात प्रेमविवाहास कुटुंबीयांचा विरोध झाल्याने २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दृष्टि वाघमारे (वय २३) असे मृत तरुणीचे नाव असून, तिने आपल्या राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (एडीआर) करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ जानेवारी रोजी उघडकीस आली. दृष्टि एका तरुणाशी प्रेमसंबंधात होती आणि त्याच्याशी विवाह करण्याची तिची इच्छा होती. मात्र तिच्या कुटुंबीयांचा या विवाहाला तीव्र विरोध होता.

कुटुंबीय तिचे लग्न ठरवून पारंपरिक पद्धतीने म्हणजेच अरेंज मॅरेज करण्याचा आग्रह धरत होते. या निर्णयामुळे आणि कुटुंबीयांकडून होत असलेल्या दबावामुळे दृष्टि मानसिक तणावात होती.

हे ही वाचा:

केंद्र खत अनुदानावर ३७,९५२ कोटी करणार खर्च

रोज एका चमचा तीळ खाल्याने मिळते ताकद

उत्तर प्रदेशातील २.८९ कोटी मतदारांची नावे वगळली

मुंबईत रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

शनिवारी घरातील सदस्य बाहेर असताना किंवा इतर कामात व्यस्त असताना दृष्टिने घरातील खोलीत गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
या प्रकरणात कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नसून, कुटुंबीयांचे जबाब आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. प्रेमसंबंध, कुटुंबीयांचा विरोध आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक तणाव या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपासानंतरच घटनेबाबतचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version