अलीकडच्या वर्षांत, उत्तराखंडमधील लोकसंख्याशास्त्र बदलण्यासाठी किंवा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी एक मोठा कट तयार झाला आहे. यामध्ये जमीन जिहाद, लव जिहाद, व्यवसाय जिहाद, लोकसंख्या जिहाद अशा विविध मार्गांचा समावेश असून त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागले आहेत.
२०१२-१७ दरम्यान सत्तेत असताना काँग्रेस पक्षाने बजावलेल्या भूमिकेमुळे हा लोकसंख्याशास्त्रीय बदल घडून आला आणि शेजारील उत्तर प्रदेशातून स्थलांतरितांच्या आगमनाला व स्थायिक होण्यास मदत झाली. विशेषतः माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांच्या कार्यकाळात, स्थलांतरितांना उत्तराखंडमध्ये स्थायिक होण्यास मदत करणे आणि त्यांना अधिकृत कागदपत्रे उपलब्ध करून देणे, ही या भूमिकेची मुख्य कारणे आहेत.
ही हिंदुविरोधी कारस्थान काँग्रेसच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आणि त्यानंतर आलेल्या कोविड-१९ च्या दोन वर्षांच्या काळात घडले. या कालावधीत सरकारी यंत्रणा आरोग्य आणि इतर आवश्यक सेवा नागरिकांना पुरविण्यात व्यस्त होती. त्यामुळे अनेक बेकायदेशीर व्यवसाय फोफावले. यामध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण, सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार यांसारख्या गोष्टी घडल्या. अशा प्रकारे अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनी सरकारी कागदपत्रे मिळवली आणि सरकारी जमिनी बेकायदेशीर रित्या बळकावून त्यावर त्यांच्या वसाहती बसवल्या.
हे ही वाचा:
हरीश राणा यांच्या निधनानंतर इच्छामृत्यूसाठी मुंबई महानगरपालिकेकडे ७५ अर्ज
रशिया ठरला भारतासाठी ऊर्जा ‘लाइफलाइन’;तेल आयातीत ८२% वाढ
सायना नेहवाल: भारताचा ऑलिम्पिक अभिमान
सत्तापालटानंतर नेपाळचे माजी पंतप्रधान केपी ओली यांना अटक
उत्तराखंडमध्ये परदेशी मुस्लिमांचे अवैध स्थलांतर ही गेल्या दशकाहून अधिक काळापासून एक समस्या आहे. उत्तराखंडमध्ये बांगलादेशी वंशाचे नऊ लाखांहून अधिक अवैध स्थलांतरित राहतात. उत्तराखंड राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशातील अवैध स्थलांतरित आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रोहिंग्या हे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात प्रवेश करत आहेत. हे स्थलांतरित अनेकदा सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे मशिदी, मिनार आणि मदरसे बांधतात.
२००१ च्या जनगणनेनुसार, उत्तराखंडच्या लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण ८४.९५% होते, तर मुस्लिमांचे प्रमाण ११.९२% होते. २०११ च्या जनगणनेपर्यंत, हिंदू लोकसंख्या घटून ८२.९७% झाली होती आणि मुस्लिम लोकसंख्या वाढून १३.९५% झाली होती, म्हणजेच दहा वर्षांत २% वाढ झाली होती. या काळात, आसामनंतर उत्तराखंडमध्ये देशातील मुस्लिम लोकसंख्येचा दुसरा सर्वाधिक वाढीचा दर नोंदवला गेला.
हिंदूंना पवित्र असणाऱ्या हरिद्वारमध्ये सर्वाधिक ३४.२८% मुस्लिम लोकसंख्या असून, त्याखालोखाल उधम सिंग नगर (२२.५८%), डेहराडून (११.९१%) आणि नैनिताल (१२.६५%) यांचा क्रमांक लागतो. नैनिताल सारख्या डोंगराळ जिल्ह्यांमधील मुस्लिम लोकसंख्येतील जलद वाढ ही सध्या सुरू असलेल्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर प्रकाश टाकते.
हरिद्वार हे हिंदूंसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथील सर्व मठ आणि आखाडे ही हिंदू धर्माची आध्यात्मिक केंद्रे आहेत, जिथे धार्मिक विधी पार पाडले जातात. कुंभमेळा भरणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक आहे. तीन कोटींहून अधिक भाविक येथून पवित्र गंगाजल घेऊन जातात. परंतु ‘पंचजन्य’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हरिद्वार जिल्ह्यातील मुस्लिम लोकसंख्या दर दहा वर्षांनी ४० टक्क्यांनी वाढत असल्याने, या हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्राची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर अनेक उद्योगधंदे येथे आले. मुस्लिम कंत्राटदारांनी बिजनौर, मुजफ्फरनगर, मेरठ, सहारनपूर इत्यादी मुस्लिम बहुल जिल्ह्यामध्ये मुस्लिम मजुरांना हरिद्वारला आणले. जसे जसे मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढत आहे, तसे तसे बेकायदेशीररित्या जमीन बळकावणे, सरकारी जमिनीवर बेकायदेशीर वसाहती वसवणे, अनधिकृत रित्या मस्जिद आणि मजारी उभ्या करणे, हिंदू मुलींना फूस लावून लव जिहादच्या जाळ्यात अडकवणे, बेकायदेशीर आणि देशविघातक कामांना बळ देणे, हिंदू आस्था असलेल्या जागांच्या भोवती वेढा घालणे, भारतीय लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्राच्या भोवती अनधिकृत आणि बेकायदेशीर मुस्लिम वसाहतींचा वेढा घालणे आदी अनेक गोष्टींमधून एकच गोष्ट दिसून येते की हिंदू आस्था असलेल्या देवभूमीला मुस्लिम बहुल करणे.
१. उत्तराखंडमध्ये सरकारी जमिनीवर २,००० हून अधिक बेकायदेशीर दर्गे बांधण्यात आल्याचे आढळून आले आहे.
२. ९,००० एकरहून अधिक सार्वजनिक जमिनी, जमीन जिहादद्वारे बळकावण्यात आली आहे आणि हा आकडा याच्यापेक्षा किती तरी जास्त असू शकतो.
३. लव्ह जिहादच्या केसेसमध्ये झालेली वाढ.
४. सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांना मुस्लिम वस्त्यांचा घेरा.
५. उत्तराखंडमध्ये, विशेषतः हरिद्वारमध्ये, गंगा नदीच्या काठावर गैरहिंदू, विशेषतः मुस्लिमांकडून होणारे अतिक्रमण आणि कारवाया.
६. बदलती लोकसंख्याशास्त्रीय रचना, ज्यामध्ये मुस्लिम लोकसंख्येतील वाढ आणि अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे, ज्याचा हिंदू अस्मितेला धोका आहे.
हिंदुबहुल उत्तराखंड ताब्यात घेण्याचे हे धोकादायक इस्लामी नियोजन आहे.
