जर्मनीतील गेल्सेनकिर्चेन येथे बँक कर्मचाऱ्यांना त्यांची नाताळाची सुट्टी चांगलीच महागात पडली आहे. नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटत असताना, दरोडेखोरांच्या एका टोळीने बँकेत मोठा दरोडा टाकला आणि अंदाजे ३० दशलक्ष युरो किमतीची रोकड, सोने आणि दागिने लंपास केले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
जर्मनीच्या पश्चिमेकडील शहरातील स्पार्कासे बचत बँकेच्या शाखेत हॉलिवूड शैलीने दरोडा टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. चोरांनी तिजोरी फोडून लुटमार करून पळ काढला. दरोड्याच्या घटनेनंतर मंगळवारी शेकडो ग्राहकांनी शाखेबाहेर गर्दी केली आणि माहिती देण्याची मागणी केली. पोलिसांनी माहिती दिली की, दरोडेखोरांनी पार्किंग गॅरेजमधून बँकेच्या भूमिगत तिजोरीच्या खोलीत प्रवेश केला. शनिवारी आणि रविवारी रात्री पार्किंग गॅरेजमध्ये मोठ्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या अनेक पुरुषांना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर फुटेजमध्ये सोमवारी सकाळी पार्किंग गॅरेजमधून एक काळी ऑडी आरएस 6 बाहेर पडताना दिसत होती, ज्यामध्ये मुखवटा घातलेले लोक होते.
हे ही वाचा:
“ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा नाश केला आहे”
नुसरत भरुचाने केले महाकाल दर्शन, मौलाना भडकले
मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय
भारताने चीनवर लादले तीन वर्षांचे स्टील टॅरिफ; कारण काय?
२४ डिसेंबरच्या संध्याकाळपासून ख्रिसमस निमित्त जर्मनीमध्ये बहुतेक दुकाने आणि बँका बंद असतात. दरोडेखोरांनी गुरुवार आणि शुक्रवारी असणाऱ्या या सुट्टीचा फायदा घेतला. पोलिसांनी सांगितले की, चोरीचा हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. चोरीला गेलेल्या हजारो बॉक्सचे सरासरी विमा मूल्य १०,००० युरोपेक्षा जास्त होते; त्यामुळे नुकसानीचा अंदाज ३० दशलक्ष इतका आहे.
