हाँगकाँगमध्ये बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू; २७९ जण बेपत्ता

बचावकार्य अजूनही सुरू

हाँगकाँगमध्ये बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू; २७९ जण बेपत्ता

हाँगकाँगच्या ताई पो जिल्ह्यात उंच इमारतींना लागलेल्या भीषण आगीत किमान ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. काही रहिवासी आत अडकल्याचे वृत्त आहे आणि पोलिसांचे म्हणणे आहे की, २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत. जगातील प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाँगकाँगमधील गेल्या तीन दशकांतील ही सर्वात भीषण आग असल्याचे मानले जाते.

बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २००० अपार्टमेंट असलेल्या इमारतींच्या गृहनिर्माण इस्टेटमध्ये ही आग लागली आणि संपूर्ण हाँगकाँग हादरून गेला. प्रत्येक इमारत आठ मजली टॉवर आहे. सुमारे २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत. २९ जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. हाँगकाँगमधील एका आठ मजली इमारतीला आग लागल्यानंतर मोठी हानी झाली आहे.

हाँगकाँग पोलिसांनी गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ताई पो परिसरातील वॉंग फुक कोर्ट या निवासी इमारतीत लागलेल्या आगीत ४४ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. हाँगकाँग चीफ एक्झिक्युटिव्ह जॉन ली यांनी सांगितले की अग्निशामक दलाच्या प्रयत्नांमुळे वॉंग फुक कोर्टमधील आग हळूहळू नियंत्रणात आणली जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सुमारे २७९ लोक अजूनही बेपत्ता आहेत. २९ लोक रुग्णालयात दाखल असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

हे ही वाचा..

यूएस नॅशनल गार्डवरील हल्ला हे दहशतवादी कृत्य!

राम मंदिर ध्वजारोहणावर टिपण्णी करणाऱ्या पाकला फटकारलं; काय म्हणाला भारत?

‘वसुधैव कुटुंबकम’च्या भावनेने जगाचे स्वागत करण्यास सज्ज

चाणक्य डिफेन्स डायलॉग : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य अतिथी म्हणून सहभागी

ली यांनी सांगितले की सरकारकडून बचाव कार्यासाठी पूर्ण मदत करण्यात येत आहे. त्यांनी विविध विभागांना आग विझवणे, अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, जखमींचा उपचार करणे, कुटुंबीयांना मदत आणि मानसिक आधार देणे तसेच दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. फायर सर्व्हिस विभागाला बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २:५१ वाजता घटनेची माहिती मिळाली. आगीची तीव्रता पाहता संध्याकाळी ६:२२ वाजता ही आग ‘नंबर ५ अलार्म फायर’ म्हणून घोषित करण्यात आली. बचावकार्य अद्याप सुरू आहे.

Exit mobile version