ब्रिटनमध्ये जवळपास सर्वच महिलांवर लैंगिक अत्याचार- संयुक्त राष्ट्र संघ

ब्रिटनमध्ये जवळपास सर्वच महिलांवर लैंगिक अत्याचार- संयुक्त राष्ट्र संघ

युनाइटेड किंगडममध्ये (युके) जवळपास सर्वच महिलांवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) एका अहवालात सांगितले आहे. यूएनच्या महिला समितीने युकेमध्ये एक सर्वेक्षण केले. त्यानुसार युकेमधील १८-२४ वयोगटाच्या तरुण मुलींपैकी ९७% मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे कळत आहे. याशिवाय सर्वच वयोगटाच्या ८०% महिलांना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. याशिवाय अजून एका सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ९६% महिलांनी लैंगिक अत्याचाराच्या घटनांची तक्रारही केली नाही. यापैकी ४५% महिलांनी, अशा पद्धतीने तक्रार करून काहीही फायदा झाला नसता असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

इस्लामी कट्टरतेच्या विरोधात स्वित्झरलँडचे महत्वाचे पाऊल

ब्रिटनमध्ये गेली अनेक वर्षे सुरु असलेला ‘ग्रूमिंग गॅंग’ हा विषय महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर झाला आहे. ‘ग्रूमिंग गॅंग’ म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश मधून आलेले मुस्लिम तरुण आणि ब्रिटनमध्ये पूर्वीपासून राहात असलेले मुस्लिम यांच्यातील काही घटकांनी तेथील तरुण मुलींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे रॅकेट सुरु केले आहे. तरुण मुलींना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटनादेखील यामुळे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हा विषय ब्रिटनच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत ‘पॉलिटिकली करेक्ट’ नसल्यामुळे दुर्लक्षित राहिला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या विषयावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करून देखील या विषयावर कोणतीही राजकीय हालचाल होताना दिसत नाही. या सर्वेक्षणानंतर किमान हा विषय चर्चेत येईल अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version