अमेरिकन व्यक्तीला २,००० डॉलर्स मिळणार!

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकन व्यक्तीला २,००० डॉलर्स मिळणार!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकेतून अंतर्गत आणि जगभरातून टीका होत असताना त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमक टॅरिफ धोरणाचे समर्थन केले. याशिवाय त्यांनी असे आश्वासन दिले की, श्रीमंत वगळता प्रत्येक अमेरिकनला लवकरच त्यांच्या प्रशासनाने गोळा केलेल्या टॅरिफ महसूलातून किमान २,००० डॉलर्स मिळतील.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जे लोक अतिरिक्त शुल्क आकारणीचा विरोध करत आहेत ते मूर्ख आहेत! त्यांच्या प्रशासनाने अमेरिकेला जगातील सर्वात श्रीमंत, सर्वात प्रतिष्ठित देश बनवले आहे, जवळजवळ कोणतीही महागाई नाही आणि विक्रमी शेअर बाजार किंमत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, देशाला जकातींमधून ट्रिलियन डॉलर्स मिळत आहेत, ज्याचा वापर ३७ ट्रिलियन डॉलर्सचे राष्ट्रीय कर्ज कमी करण्यासाठी केला जाणार आहे. प्रशासन लवकरच ते फेडण्यास सुरुवात करेल आणि सर्व अमेरिकन लोकांना (उच्च उत्पन्न असलेल्या लोकांचा समावेश नाही) प्रति व्यक्ती किमान २००० डॉलर्सचा लाभांश देईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हे ही वाचा:

मुस्लिम, ख्रिश्चनांसाठी संघाचे दरवाजे उघडे, पण भारतमातेचे पुत्र म्हणून या!

वैश्विक आर्थिक वाढीत भारताचा वाटा ८-१० टक्के

कोरड्या त्वचेतून कसा मिळतो आराम

मधुबनीला घुसखोरांचं लॉंचिंग पॅड होऊ द्यायचं नाही

तथापि, प्रस्तावित टॅरिफ लाभांश कसा वितरित केला जाईल किंवा तो कधीपासून लागू होईल याबद्दल ट्रम्प यांनी तपशील दिलेला नाही. यूएस ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट, ज्यांनी ऑगस्टमध्ये सीएनबीसीला सांगितले की, प्रशासनाचे लक्ष हे टॅरिफ महसूल वापरून ३८.१२ ट्रिलियन डॉलर्स राष्ट्रीय कर्ज फेडण्यावर आहे. ट्रम्प यांनी कायम असा युक्तिवाद केला आहे की, टॅरिफ हे त्यांचे सर्वात मजबूत आर्थिक शस्त्र आहे. या धोरणामुळे अमेरिका अधिक मजबूत, श्रीमंत आणि अधिक स्वतंत्र झाली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version