अयोध्या राम मंदिरात झालेल्या देणगी चोरीबाबत अनुपम खेर यांनी अलीकडे एक वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर, अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. शाह यांच्या विधानांवर अनुपम खेर यांचे प्रत्युत्तरदेखील चर्चेचा विषय ठरत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणतात, “मी तुमच्याबद्दल कधीही अपशब्द वापरले नाहीत किंवा तुमचा अपमान केला नाही. इतके यश मिळवूनही तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य नैराश्यात घालवले आहे. मात्र, तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टीका केली. तुम्ही दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शाहरुख खान आणि विराट कोहली यांच्यावर टीका करू शकता, तर मला खात्री आहे की मी खूप चांगल्या लोकांच्या सहवासात आहे. त्यापैकी कोणीही तुमच्या विधानांना कधीच गांभीर्याने घेतले नाही, कारण सर्वांना माहित आहे की इतकी वर्षे तुम्ही घेत असलेल्या अमली पदार्थांमुळे तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजत नाही.”
नसीरुद्दीन शाह यांच वक्तव्य
हा वाद २०२० मध्ये सुरू झाला होता. त्या वेळी नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत अनुपम खेर यांच्या सरकारसमर्थक भूमिकेवर टीका करत, “अनुपम खेर यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते एक ‘क्लाऊन’ आहेत. चापलुसी त्यांच्या रक्तात आहे,” अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
हे ही वाचा:
पवारांना मागे टाकत देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम!
डॉलर वधारला; मौल्यवान धातूंचा दर घसरला
तेल दरवाढीने पाकिस्तानची कोंडी; पेट्रोल, बस-रिक्षा, मालवाहतुकीचे दर वाढले
पश्चिम बंगालमध्ये लागू झालेला ‘गुंडा दमन कायदा’ काय आहे?
राम मंदिर प्रकरणावर खेर यांची प्रतिक्रिया
राम मंदिर प्रकरणावर बोलताना खेर यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या घटनेचे वर्णन “अत्यंत किरकोळ बाब” असे केले होते आणि त्याची तुलना मुघल काळातील मंदिरांवरील हल्ले व लुटालुटीशी केली होती. त्यानंतर ही क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. ते म्हणाले, “लोक या गोष्टीचा खूप मोठा मुद्दा बनवत आहेत. मंदिरात लूट झाली आहे, असे शब्द वापरले जात आहेत. मुघलांनी जेव्हा आपली मंदिरे उद्ध्वस्त केली, तेव्हा मंदिरे लुटली गेली होती. मुघल राज्यकर्त्यांनी जेव्हा ब्राह्मणांची हत्या केली आणि त्यांची जानवी (यज्ञोपवीत) गोळा करून त्यांचे वजन केले, तेव्हा मंदिरे लुटली गेली होती. मुघल सम्राट जेव्हा इथे आले आणि त्यांनी प्रत्येक मंदिरातील मौल्यवान वस्तू नेल्या, तेव्हा मंदिरे लुटली गेली होती. मंदिराच्या आवारात जेव्हा महिलांवर बलात्कार झाले, तेव्हा मंदिरे लुटली गेली होती. ती घटना खूप मोठी शोकांतिका होती. जर आपण त्यातून सावरू शकलो असू, तर चोरीची ही घटना अत्यंत किरकोळ आहे.”
