बलुच लढवय्यांचा पाकिस्तानमधील सूरब शहरावर ताबा?

" पोलिस ठाणे पेटवले, महत्त्वाचे सरकारी संस्थानांवर कब्जा"

बलुच लढवय्यांचा पाकिस्तानमधील सूरब शहरावर ताबा?

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील सूरब शहरावर बलुच लढवय्य्यांनी नियंत्रण मिळवलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. ABP News द्वारा प्राप्त दृश्यांमध्ये शहरातील पोलिस ठाणे उद्ध्वस्त करून पेटवण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने घेतली असून त्यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “बलुच लिबरेशन आर्मीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी सूरब शहरावर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी बँक, लेव्हीज स्टेशन आणि पोलिस ठाण्यासह प्रमुख सरकारी संस्थांवर कब्जा केला आहे.”

हे ही वाचा:

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बारव का बांधले?

इस्रायलने हिजबुल्लाहचा टॉप कमांडर मोहम्मद अली जमौलला केले ठार!

“तुच आहेस रे बुमराह!”.. हातातून निसटणारा सामना एका यॉर्करनं वाचवला!

दिल्लीत कोरोनाचा पहिला बळी!

रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचे शहर

सूरब हे शहर बलुचिस्तानच्या कालात विभागात येते आणि २०२३ च्या अंदाजानुसार सुमारे ४० हजार लोकवस्तीचे शहर आहे. हे शहर प्रांतिक राजधानी क्वेट्टापासून अवघ्या १५० किमी अंतरावर आहे, त्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढते.

बीएलएने असा दावाही केला आहे की त्यांच्या लढवय्य्यांनी आता क्वेट्टा–कराची महामार्ग आणि सूरब–गिडार मार्गावरही नियंत्रण मिळवलं असून, त्या मार्गांवर गस्त घालण्यात येत आहे.

पाककडून अधिकृत प्रतिसाद नाही

पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून अद्याप या घटनेवर कोणताही अधिकृत प्रतिसाद देण्यात आलेला नाही. मात्र, एका संपूर्ण शहरावर बंडखोर गटाने नियंत्रण मिळवणे, हे पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करते.

Exit mobile version