बांगलादेश: खोकन चंद्र दास यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

चौकशीतून अधिकचे खुलासे

बांगलादेश: खोकन चंद्र दास यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

बांगलादेशमध्ये हिंदू व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५० वर्षीय खोकन चंद्र दास यांना गेल्या आठवड्यात केउरभंगा बाजार येथील एका फार्मसीमधील कामावरून घरी जात असताना जाळण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून अधिकचे खुलासे झाले आहेत.

खोकन दास यांच्यावर स्थानिक बनावटीच्या शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. यानंतर त्यांचा मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम लुटण्यात आली. त्यानंतर त्यांना पेटवून देण्यात आले. खोकन चंद्र दास यांच्यावर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, ३१ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर आणि त्याला जाळल्यानंतर, खोकन दास यांनी जवळच्या तलावात उडी मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्यांना वाचवले आणि उपचारासाठी रुग्णालयात नेले. ढाका येथील नॅशनल बर्न अँड प्लास्टिक सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

शरीयतपूर येथील हत्येचा तपास तीव्र होत असताना, पोलिसांनी किशोरगंजच्या बाजितपूर येथून तीन जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. त्यांची ओळख सोहाग खान (२७), रब्बी मोल्ला (२१) आणि पलाश सरदार (२५) अशी आहे. हे सर्वजण दामुड्याचे रहिवासी आहेत. आरोपींना अटक झालेली असली तरी दास यांच्या हत्येमागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

हे ही वाचा..

सोमनाथ मंदिर स्वाभिमानाचे प्रतिक… पंतप्रधान मोदींचा विशेष लेख

भारतावर आणखी कर लादणार! ट्रम्प यांनी का दिला इशारा?

‘एअरोनॉटिक्स २०४७’ चा बेंगळुरूत शुभारंभ

ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या कार्यक्रमाला वेग

गेल्या महिन्यात, मैमनसिंगमधील कपड्याच्या कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास यांना ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने मारहाण करून ठार मारले होते, तर आणखी एका हिंदू तरुण अमृत मोंडल यांची खंडणीच्या आरोपावरून राजबाडी येथे मारहाण करून हत्या करण्यात आली होती.

Exit mobile version