बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात असून पुन्हा एकदा एका हिंदू तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील एका कारखान्यात सुरक्षा ड्युटीवर असताना एका हिंदू कापड कामगाराची त्याच्या सहकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली. गेल्या दोन आठवड्यात या भागात ही तिसरी हत्या झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी संध्याकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास भालुका उपजिल्हा परिसरातील लबीब ग्रुपच्या सुलताना स्वेटर्स लिमिटेड या गारमेंट युनिटमध्ये ही संतापजनक घटना घडली. पीडित व्यक्तीचे नाव बजेंद्र बिस्वास (वय ४२ वर्षे) असे आहे, तर आरोपी नोमान मिया (वय २९ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, दोघेही कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते आणि ते परिसरातील अन्सार बॅरेकमध्ये राहत होते. नोमान मियाने अनौपचारिक आणि विनोदी पद्धतीने बिस्वासवर सरकारने दिलेले बंदूक रोखले. काही क्षणांनंतर बंदुकीतून सुटलेली गोळी बिस्वासच्या डाव्या मांडीला लागली.
हेही वाचा..
पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पोलीस चकमकीत खुनाचा आरोपी जखमी
ममता बॅनर्जी यांच्या विचारांवर जिहादी घटकांचा ताबा
जनजातीय समाजाची अस्मिता व वारसा जतन करण्याची गरज
घटनेनंतर बिस्वास यांना तातडीने भालुका उपजिल्हा आरोग्य संकुलात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद जाहिदुल इस्लाम यांनी सांगितले की, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि घटनेत वापरलेली बंदूक जप्त करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी मैमनसिंग मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. या हत्येमुळे भालुका परिसरात तणाव वाढला आहे. १८ डिसेंबर रोजी त्याच परिसरात दिपू चंद्र दास यांना मारहाण करून, जाळून ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे. ज्यामुळे या भागात पुन्हा हिंसक घटना घडल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
