इस्रायलने अनेक वर्षे मोबाईल फोन नेटवर्कमध्ये घुसखोरी करून आणि इराणच्या ट्रॅफिक कॅमेरा नेटवर्कला हॅक करून सर्वोच्च नेते अली खामेनी आणि त्यांच्या सुरक्षा ताफ्याच्या हालचालींचा मागोवा घेतला होता. २८ फेब्रुवारी (शनिवार) रोजी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यापूर्वी ही माहिती गोळा करण्यात आली होती. तेहरानमधील पाश्चर स्ट्रीटजवळ जिथे खामेनेई यांची हत्या करण्यात आली प्रमुख इराणी अधिकाऱ्यांचे अंगरक्षक आणि चालक कधी कामावर पोहोचतात, यावर इस्रायली गुप्तचर लक्ष ठेवून होते, अशी माहिती फायनान्शियल टाइम्सने दिली आहे.
दोन सूत्रांच्या मते, तेहरानमधील जवळपास सर्व ट्रॅफिक कॅमेरे अनेक वर्षांपासून हॅक करण्यात आले होते. त्यातील छायाचित्रे एन्क्रिप्ट करून दक्षिण इस्रायल आणि तेल अवीवमधील सर्व्हरवर पाठवली जात होती. एका कॅमेर्यामुळे कडेकोट सुरक्षा असलेल्या संकुलातील नियमित भागाचे स्पष्ट दृश्य मिळाले आणि अधिकाऱ्यांचे वाहन कुठे पार्क केले जाते याची माहिती मिळाली.
सुरक्षा रक्षकांची निवासस्थाने, कामाचे तास, प्रवासाचे मार्ग आणि ते नियमितपणे ज्या व्यक्तींना सुरक्षा देत असत त्यांची माहिती प्रगत अल्गोरिदमद्वारे संकलित करून त्यांच्या फाईलमध्ये जोडली गेली, असे अहवालात नमूद आहे. ही क्षमता अनेक वर्षे चाललेल्या गुप्तचर मोहिमेचा भाग होती, ज्यामुळे खामेनी यांच्या हत्येस हातभार लागला. इस्रायल आणि सीआयए यांना ८६ वर्षीय खामेनी कार्यालयात नेमके कधी पोहोचतील आणि त्यांच्यासोबत कोण असेल याची अचूक माहिती मिळाली होती.
याशिवाय, इस्रायलने पाश्चर स्ट्रीटजवळील सुमारे डझनभर मोबाईल टॉवरच्या काही भागात हस्तक्षेप करून कॉल केल्यावर फोन ‘व्यस्त’ असल्याचे भासवले, ज्यामुळे सुरक्षा पथकाला संभाव्य इशारे मिळू शकले नाहीत. एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला तेहरान तितकाच परिचित होता जितका जेरुसलेम. आणि ज्या ठिकाणाची तुम्हाला पूर्ण ओळख असते, तिथे एखादी लहानशी गोष्टही वेगळी दिसली तर लगेच लक्षात येते.”
हे ही वाचा:
प्रकाश आंबेडकर बरळले, होळी आहे, मोदींचा बळी द्या!
रंगपंचमी विशेष: रंग खेळताना त्वचेची अशी घ्या काळजी, राहील तजेलदार आणि सुरक्षित!
भारत–कॅनडात २.६ अब्ज डॉलर्सचे यूरेनियम डील
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफओचा व्याजदर ८.२५% कायम
इस्रायलची गुप्तचर आणि तांत्रिक ताकद
इस्रायलची अत्याधुनिक सिग्नल इंटेलिजन्स युनिट युनिट ८२००, परदेशी गुप्तचर संस्था मोसादकडून मिळालेली मानवी माहिती आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेने प्रक्रिया केलेला प्रचंड डेटा यामुळे शत्रूराष्ट्राच्या राजधानीचे सखोल चित्र तयार झाले.
एका सूत्रानुसार, इस्रायलने “सोशल नेटवर्क अॅनालिसिस” नावाची गणिती पद्धत वापरून अब्जावधी डेटा पॉइंट्स तपासले आणि निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाचे केंद्र ओळखून नवीन लक्ष्य निश्चित केले.
गुप्तचर तज्ज्ञ इटाय शापिरा यांनी सांगितले, “इस्रायली गुप्तचर संस्कृतीत लक्ष्यनिर्धारण ही सर्वात महत्त्वाची रणनैतिक बाब आहे. जर निर्णय घेणाऱ्याने एखाद्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला, तर आवश्यक लक्ष्य माहिती पुरवणे हे आमचे कर्तव्य असते.”
मागील संघर्षातील उदाहरण
जून महिन्यातील १२ दिवसांच्या संघर्षात इस्रायलची गुप्तचर क्षमता स्पष्ट दिसली, जेव्हा काही मिनिटांतच डझनभर इराणी अणु तज्ज्ञ आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले. सायबर हल्ले, अल्प पल्ल्याचे ड्रोन आणि सीमाबाहेरील अचूक क्षेपणास्त्रांनी इराणची हवाई संरक्षण प्रणाली अर्थात रडार निष्क्रिय केली. एका अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही एकप्रकारे त्यांचे डोळे काढले.”
इस्रायली वैमानिकांनी ‘स्पॅरो’ नावाचे विशेष क्षेपणास्त्र वापरले, जे सुमारे १ हजार किमी अंतरावरून जेवणाच्या टेबलाएवढ्या लहान लक्ष्यावर अचूक प्रहार करू शकते.
राजकीय निर्णय आणि अंतिम पुष्टी
खामेनी यांच्यावर हल्ला करणे हा राजकीय निर्णय होता. जेव्हा सीआयए आणि इस्रायलला समजले की ते त्यांच्या कार्यालयात बैठक घेणार आहेत, तेव्हा संधी अनुकूल असल्याचे मानण्यात आले. युद्ध औपचारिकपणे सुरू झाल्यावर त्यांचा मागोवा घेणे अधिक कठीण झाले असते, कारण इराणी नेतृत्व भूमिगत बंकरमध्ये गेले असते.
अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी त्या सकाळी खामेनी आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र येणार असल्याची खात्री केली. इस्रायलच्या सिग्नल इंटेलिजन्समधून मिळालेल्या डेटासह अमेरिकेकडे एक मानवी स्रोत देखील होता. त्यामुळे योग्य वेळी लक्ष्यावर ३० अचूक बॉम्ब डागणे शक्य झाले.
इस्रायलने म्हटले, “सकाळी हल्ला केल्यामुळे, इराण सज्ज असतानाही, आम्हाला दुसऱ्यांदा रणनैतिक धक्का देण्याचा फायदा मिळाला.”
दोन वेगळ्या घटनांचा परिणाम
माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांनी २००१ मध्ये तेव्हाचे मोसाद प्रमुख मीर डॅगन यांना इराणला प्राधान्य देण्याचा आदेश दिला होता. माजी मोसाद अधिकारी सिमा शाइन यांनी सांगितले की शेरॉन म्हणाले होते, “मोसाद जे करत आहे ते ठीक आहे. पण मला इराण हवे आहे — तेच तुमचे लक्ष्य.” दुसरी घटना म्हणजे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेला हमासचा प्राणघातक हल्ला, ज्यामागे इराणचा पाठिंबा असल्याचा इस्रायलचा विश्वास आहे.
