पाकची नाटकं; दहशतवाद पोसण्याचे तथ्य लपवू शकत नाहीत!

शरीफ यांच्या भाषणानंतर भारताने पाकला फटकारले

पाकची नाटकं; दहशतवाद पोसण्याचे तथ्य लपवू शकत नाहीत!

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) केलेल्या भाषणाबद्दल भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काश्मीर आणि सिंधू पाणी करारावरील पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या वक्तव्यावर भारताने शनिवारी टीका केली. तसेच पाकिस्तानवर दहशतवादाचा पुरस्कार केल्याचा आरोप केला आहे.

भारतीय राजदूत पेटल गहलोत यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून हास्यास्पद नाटके पाहायला मिळाली. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचा गौरव केला. मात्र, ही नाटके तथ्य लपवू शकत नाही, पेटल गहलोत यांनी शरीफ यांच्या भाषणाला उत्तर देताना संयुक्त राष्ट्रांना सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानने “पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादी संघटनेला” संरक्षण दिले होते याची आठवण गहलोत यांनी यावेळी करून दिली. दहशतवाद तैनात करण्याच्या आणि निर्यात करण्याच्या परंपरेत दीर्घकाळापासून रमलेल्या देशाला हास्यास्पद कथा पुढे नेण्यात काहीच लाज वाटत नाही, असेही ते म्हणाले.

पुढे त्या म्हणाल्या की, हे लक्षात घ्यायला हवे की पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भागीदार असल्याचे भासवत ओसामा बिन लादेनला एक दशक आश्रय दिला होता. त्यांच्या मंत्र्यांनी अलीकडेच कबूल केले आहे की ते दशकांपासून दहशतवादी छावण्या चालवत आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या पातळीवर पुन्हा एकदा हा दुटप्पीपणा सुरू आहे यात आश्चर्य वाटायला नको.

हे ही वाचा : 

दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लक्ष रुपयांची मदत!

हिंदू राष्ट्रात M फॉर Mahadev च चालणार…

मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी भेट; विविध मुद्द्यांवर चर्चा!

बीडमध्ये मौलवी अशफाक शेखचे वादग्रस्त वक्तव्य : “मुख्यमंत्री योगींना इथेच दफन करेन”

यावेळीही, पाकिस्तानने आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. काश्मीरमधील लोकांसोबत असून त्यांच्यावरील अत्याचार थांबेल असं वक्तव्य शरीफ यांनी केलं. शाहबाझ शरीफ यांनी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सारख्या परदेशी समर्थित गटांवर त्यांच्या देशाला लक्ष्य करण्याचा आरोप केला. भारताने या विधानांना सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला खतपाणी घालण्यात पाकिस्तानची भूमिका लपविण्याचा प्रयत्न म्हणून फेटाळून लावले आहे.

Exit mobile version