“भारतीय ड्रोन रोखले नाहीत कारण…” पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे अजब स्पष्टीकरण

पाक संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांचा व्हिडीओ व्हायरल

“भारतीय ड्रोन रोखले नाहीत कारण…” पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे अजब स्पष्टीकरण

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ने दिले. यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूचं असून भारताकडूनही त्यांना जशास तसे उत्तर दिले जात आहे. पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले हाणून पाडल्यानंतर भारताने पाकिस्तानवर यशस्वी ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानची यंत्रणा हे हल्ले रोखण्यात अयशस्वी ठरल्याचे दिसून आले. यानंतर पाकिस्तानी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून यावर पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सातत्याने तणाव वाढत असताना पाकिस्तानी मंत्र्यांकडून केली जाणारी विधाने हास्यास्पद ठरत असून यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरही लाज निघत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तानने जाणूनबुजून भारतीय ड्रोनना रोखले नाही जेणेकरून त्यांची लष्करी ठिकाणे उघड होऊ नये. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ख्वाजा म्हणत आहेत की, “आम्ही भारतीय ड्रोन रोखले नाहीत कारण आम्हाला आमची ठिकाणे उघड करायची नव्हती.” त्यांच्या या विधानावरून टीका केली जात आहे तर उत्तर हास्यास्पद असल्याचा दावा केला जात आहे.

यापूर्वी, सीएनएनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ख्वाजा यांना भारतीय विमाने पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांबद्दल विचारले असता त्यांनी सोशल मीडियावरील माहिती पुरावे असल्याचा दावा केला होता. यामुळे त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची नाचक्कीही झाली होती. तर, यापूर्वी त्यांनी पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याची कबुलीही दिली होती.

हे ही वाचा..

भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अभेद्य

आपल्याकडे पीओके परत घेण्याची क्षमता

भारताच्या हल्ल्यानंतर डॉन दाऊद इब्राहिमची तंतरली, पाकिस्तानातून पळाला?

‘आकाशतीर’ने कसा घेतला पाकिस्तानी ड्रोन्सचा अचूक वेध

दुसरीकडे, भारत- पाकिस्तान संघर्षाचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेत उमटताना दिसत आहेत. खासदारांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू असून टीका केली जात आहे. भारताकडून सुरू असलेल्या प्रतिहल्ल्यांबद्दल पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले जात आहेत. खासदार शाहीद संसदेत म्हणत आहेत की, आमचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यासही घाबरत आहेत. ते घाबरट आहेत. असा पंतप्रधान किंवा नेता त्याच्या सैन्याला काय संदेश देऊ शकेल?

Exit mobile version