खलिस्तान्यांकडून तिसऱ्यांदा ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराची तोडफोड

कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी दिली माहिती

खलिस्तान्यांकडून तिसऱ्यांदा ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराची तोडफोड

कॅनेडियन पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी दावा केला की, रविवारी रात्री कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथील सरेमधील एका हिंदू मंदिरात तिसऱ्यांदा तोडफोडीची घटना घडली आहे. सोमवारी एक्सवरील पोस्टमध्ये, बोर्डमन यांनी मंदिराबाहेरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी दावा केला की, दोन संशयितांनी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या भिंतींवर आक्षेपार्ह मजकूर कोरला आणि एक सुरक्षा कॅमेरा चोरला.

पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी म्हटले आहे की, “मी सरे येथील लक्ष्मी मंदिरात गेलो होतो जिथे काल रात्री खलिस्तानवाद्यांनी तोडफोड केली. ही तिसरी वेळ आहे जेव्हा तोडफोड झाली आहे. मी व्यवस्थापन आणि भाविकांशी बोललो आणि त्यांना असे वाटत नाही की पोलिस किंवा राजकीय संस्थांना अजिबात याची काळजी आहे.” पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी स्थानिक हिंदू समुदायासाठी ही परिस्थिती अस्वस्थ करणारी असल्याचे म्हटले आहे. तसेच या हिंदू समुदायाला पोलिस आणि राजकीय नेते दोघांकडूनही पाठिंबा मिळत नाही असे ते म्हणाले. “मी व्यवस्थापनाशी बोललो आणि त्यांनी सांगितले की पहाटे ३ वाजता दोन लोक आले आणि त्यांनी संपूर्ण जागेवर आक्षेपार्ह मजकूर लिहिला आणि एक व्हिडिओ कॅमेरा चोराला,” असे पत्रकार बोर्डमन व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. पुढे ते म्हणाले की, हिंदू समुदाय नाराज असून त्यांना असेही वाटत आहे की, राजकीय वर्ग आणि त्यांना पोलिस त्यांच्या बाजूने नाही आहेत.

बोर्डमनने व्हँकुव्हरमधील रॉस गुरुद्वारातील विद्रुपीकरणाच्या आणखी एका घटनेचीही माहिती दिली. दरम्यान, कॅनेडियन हिंदू चेंबर ऑफ कॉमर्सने ब्रिटिश कोलंबियामधील लक्ष्मी नारायण मंदिरातील कथित तोडफोडीचा निषेध केला. “आम्ही खलिस्तानी अतिरेक्यांनी ब्रिटीश कोलंबियामधील लक्ष्मी नारायण मंदिराच्या तोडफोडीचा तीव्र निषेध करतो. हिंदूफोबियाच्या या कृत्याला कॅनडामध्ये स्थान नाही. आम्ही जलद कारवाईची विनंती करतो आणि सर्व कॅनेडियन लोकांना द्वेषाविरुद्ध एकत्र उभे राहण्यास सांगतो. मौन हा पर्याय नाही,” असे कॅनेडियन हिंदू चेंबर ऑफ कॉमर्सने एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे.

हे ही वाचा : 

हुथी बंडखोरांवरील हल्ल्याच्या योजना अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी कुटुंबियांसोबत केल्या शेअर?

साई किशोरला एक ओव्हरच का?

जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, तिघांचा मृत्यू!

संग्राम थोपटेंच ठरलं, ‘या’ तारखेला करणार भाजपात प्रवेश!

रविवारी (स्थानिक वेळेनुसार) ओटावा येथील कॅनेडियन खासदार चंद्रा आर्य यांनी धार्मिक स्थळांच्या विद्रुपीकरणाच्या अनेक घटनांनंतर कॅनडातील हिंदू आणि शीख समुदायांना तात्काळ एकत्र उभे राहून खलिस्तानी दहशतवाद्यांवर निर्णायक कारवाई करण्याची मागणी करण्याचे आवाहन केले. “काही वर्षांपूर्वी सुरू झालेले हिंदू मंदिरांवर हल्ले आजही सुरू आहेत हिंदू मंदिरावरील ही आक्षेपार्ह चित्रे खलिस्तानी अतिरेक्यांच्या वाढत्या प्रभावाची लक्षणे आहेत. सुसंघटित, निधीच्या मदतीने आणि महत्त्वपूर्ण राजकीय प्रभावाने समर्थित, खलिस्तानी घटक त्यांचे वर्चस्व गाजवत आहेत आणि संपूर्ण कॅनडामध्ये हिंदू आवाज यशस्वीरित्या बंद करत आहेत,” असे चंद्रा आर्य यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

Exit mobile version