१७९ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आग, सर्वजण सुरक्षित
अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मियामीला जाणाऱ्या अमेरिकन विमान AA3023 च्या लँडिंग गियरमध्ये अचानक आग लागल्याने मोठी विमान दुर्घटना टळली.
विमानातील १७९ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन दरवाजातून तात्काळ बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दल आणि विमानतळ आपत्कालीन पथकाने आग आटोक्यात आणली.
मियामीला जाण्यासाठी तयार असलेले विमान धावपट्टीवर टॅक्सी करत असताना आग लागली. या अपघातात कोणीही मृत पावले किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
