अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर अतिरिक्त कर लादण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, जर नवी दिल्लीने रशियन तेलाच्या समस्येवर मदत केली नाही तर अमेरिका भारतीय आयातीवरील सध्याचे शुल्क वाढवू शकतो. ट्रम्प यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला आणि ते म्हणाले की पंतप्रधान मोदी हे एक चांगले व्यक्ती आहेत त्यांना माहित होते की, अमेरिकन अध्यक्ष खूश नाहीत.
“भारत मला आनंदी करू इच्छित होता. मोदी खूप चांगले व्यक्ती आहेत आणि त्यांना माहित होते की, मी आनंदी नाही. आणि मला आनंदी करणे महत्त्वाचे आहे. आपण त्यांच्यावर खूप लवकर शुल्क वाढवू शकतो,” असे ट्रम्प यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटले. ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबतच्या तेल व्यापाराला सातत्याने उघड विरोध केला आहे आणि ऑगस्ट २०२५ मध्ये भारतावरील आयात शुल्क दुप्पट करून ५०% करण्याचे कारण म्हणून हा मुद्दा पुढे करण्यात आला. “जर भारताने रशियन तेलाच्या मुद्द्यावर मदत केली नाही तर आम्ही भारतावर आयात शुल्क वाढवू शकतो,” असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर अमेरिकेच्या पुढील पावलांची रूपरेषा सांगणाऱ्या एका ब्रीफिंग दरम्यान राष्ट्रपतींनी हे भाष्य केले. दक्षिण अमेरिकन राष्ट्रावरील ताज्या हल्ल्यांमध्ये तेल देखील एक मध्यवर्ती घटक होता. भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटींदरम्यान ट्रम्प यांचा नवीनतम कर वाढीचा इशारा आला आहे. ट्रम्प यांचे हे ताजे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशियान तेल खरेदी थांबवेल असे आश्वासन दिल्याचा दावा केल्यानंतर काही महिन्यांनी आले आहे. तथापि, भारताने ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केले होते आणि म्हटले होते की त्यांच्या आणि पंतप्रधान मोदींमध्ये अशी कोणतीही चर्चा झालेली नाही.
हे ही वाचा..
‘एअरोनॉटिक्स २०४७’ चा बेंगळुरूत शुभारंभ
ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या कार्यक्रमाला वेग
उधमपूरमध्ये मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचाही मृत्यू
फ्लाइटमध्ये पॉवर बँक वापरण्यावर बंदी
ट्रम्प प्रशासन रशियन तेलाच्या मुद्द्याविरुद्ध सतत दबाव आणत असतानाही, भारताने नेहमीच अशी भूमिका घेतली आहे की, त्यांची धोरणे ही बाजारपेठेतील ऑफर आणि भारतीय ग्राहकांच्या गरजांवर आधारित असतात. आता ट्रम्प यांनी नव्याने केलेल्या वक्तव्यामुळे भारत आणि अमेरिकेतील राजनैतिक संबंधांमध्ये ताण येऊ शकतो. रशिया हा भारतासाठी सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी यापूर्वी आरोप केले आहेत की, रशिया तेल व्यापारातून मिळणारा पैसा युक्रेनमधील युद्धाला चालना देण्यासाठी वापरतो.
