फिलिपाइन्समध्ये आलेल्या ‘कलमेगी’ वादळाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फिलिपाइन्सचे राष्ट्रपती फर्डिनँड ‘बोंगबोंग’ मार्कोस यांनी देशात तात्काळ राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट कौन्सिल (NDRRMC) च्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १४० लोकांचा मृत्यू झाला असून १२७ जण बेपत्ता आहेत. हजारो लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. बचाव पथकं सतत मदत आणि शोधकार्य करत आहेत.
राष्ट्रपती मार्कोस म्हणाले, “कलमेगी (ज्याला ‘टीनो’ म्हणूनही ओळखले जाते) वादळाने जे प्रदेश उद्ध्वस्त केले आहेत आणि ‘उवान’ (आंतरराष्ट्रीय नाव – फंग-वॉंग) ज्याठिकाणी परिणाम करणार आहे, त्या सर्व भागांचा विचार करून, NDRRMC च्या शिफारशीवर आम्ही ‘कलमेगी’ला राष्ट्रीय आपत्ती घोषित करतो.” NDRRMC च्या माहितीनुसार, या वादळाने ५ लाख कुटुंबे आणि सुमारे १.९ कोटी नागरिकांना प्रभावित केले आहे. याच आठवड्यात आणखी एक वादळ ‘फंग-वॉंग’ (स्थानिक नाव – उवान) फिलिपाइन्सच्या दिशेने सरकत असून, त्याचा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा..
टेक्नॉलॉजीबरोबरच प्रत्यक्ष ग्राहक संपर्कावरही भर द्या
तख्तापालट नको गं बाई… तुलसी गबार्डवर विश्वास ठेवता येईल का?
बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म प्रकरणी धवन, रैना यांच्याशी संबंधित मालमत्तेवर जप्ती
नेपाळनंतर आता पाकमधील Gen Z सरकारविरोधात रस्त्यावर! काय आहे प्रकरण?
‘कलमेगी’ हे या वर्षातील २०वे वादळ असून, त्याने भीषण विध्वंस केला आहे. फिलिपाइन्समध्ये उध्वस्तीनंतर आता हे वादळ व्हिएतनामकडे सरकत आहे. यापूर्वीच राष्ट्रपती मार्कोस यांनी परिस्थिती पाहून आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती. या घोषणेपूर्वी त्यांनी नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट कौन्सिल सोबत बैठक घेऊन परिस्थितीचे मूल्यांकन केले व विचारविनिमयानंतर निर्णय घेतला. दरम्यान, आगामी उवान वादळाबाबतही सरकार हाय अलर्टवर आहे. ‘कलमेगी’मुळे झालेल्या नुकसानीचे परीक्षण करताना ‘उवान’मुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अंदाज घेत सरकारने राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली. ‘कलमेगी’मुळे देशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
