पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमध्ये मोठ्या उत्साहात उद्घाटन केलेले ‘पिझ्झा हट’ आउटलेट नंतर बनावट असल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची माहिती व्हायरल होताच ते सोशल मीडियावर थट्टेचा विषय बनले. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच, पिझ्झा हट पाकिस्तानने आउटलेटपासून स्वतःला दूर ठेवत एक निवेदन जारी केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ख्वाजा आसिफ सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये पिझ्झा हट-ब्रँडेड आउटलेटचे उद्घाटन करताना दिसत होते. फुलांची सजावट, रिबन कापणे असा सर्व सोहळा दिसून येत असून हे सर्व एखाद्या अधिकृत समारंभासारखे वाटत होते. पण काही वेळातच हे सर्व बनावट असल्याचे लक्षात आले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पिझ्झा हट पाकिस्तानने एक सार्वजनिक निवेदन जारी करून हे आउटलेट पूर्णपणे अनधिकृत आणि फसवे असल्याचे स्पष्ट केले. कंपनीने म्हटले आहे की सियालकोट कॅन्टोन्मेंटमध्ये असलेले हे आउटलेट कोणत्याही प्रकारे पिझ्झा हट पाकिस्तान किंवा यम! ब्रँडशी संलग्न नाही. पिझ्झा हटने असेही स्पष्ट केले की रेस्टॉरंट त्यांच्या पाककृतींचे पालन करत नाही, त्यांची गुणवत्ता, अन्न सुरक्षा किंवा ऑपरेशनल मानकांचे पालन करत नाही. ट्रेडमार्कचा गैरवापर रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे असे कंपनीने म्हटले आहे.
Khawaja Asif, the so-called Defence Minister, ends up inaugurating a fake Pizza Hut franchise in Sialkot.
Pizza Hut issued a statement calling the franchise a fraud.
These are the dumb boomers imposed on us. pic.twitter.com/Q77qLX3ekE
— MD Umair Khan (@MDUmairKh) January 20, 2026
हे ही वाचा:
सनातन धर्मावर द्वेषपूर्ण टिप्पणी करणाऱ्या उदयनिधीचे कान उपटले!
डॉ. अशोक मोडक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजली सभा
उद्योजक प्रशांत कारुळकर यांना देवरुखे भूषण पुरस्कार
आरोग्यदायी हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात?
ही घटना समोर येताच, वापरकर्त्यांनी संरक्षण मंत्र्यांसह देशाची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी मीम्स बनवून शेअर केले आहेत. तर, अनेकांनी या संपूर्ण घटनेनंतर एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमापूर्वी मूलभूत तपासणी का केली गेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की रिबन कापतानाचे फोटो आता तपासणीचे महत्त्वाचे एक ज्वलंत उदाहरण बनले आहेत. शिवाय संरक्षण मंत्र्यांचा सहभाग असताना असे काही उघडकीस आल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली आहे.
