भारताविरोधात अण्वस्त्रांच्या धमक्या देत अमेरिकेत भाषण केलेल्या पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या वक्तव्यावर भारत सरकारच्या सूत्रांनी सोमवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सूत्रांनी या वक्तव्याला “अत्यंत बेजबाबदार” ठरवत म्हटले की, पाकिस्तान आपल्या कृतींमुळे प्रादेशिक तसेच जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. त्यांनी हेही नमूद केले की, “अमेरिका जेव्हा जेव्हा पाकिस्तानच्या लष्कराला पाठिंबा देते, तेव्हा ते आपला खरा चेहरा दाखवतात.”
अधिकृत दौर्यावर अमेरिकेत असलेल्या मुनीर यांनी रविवारी खासगी जेवणावळी दरम्यान चेतावणी दिली होती की, जर नवी दिल्लीकडून अस्तित्वावर संकट आले तर इस्लामाबाद “अर्ध्या जगाला सोबत घेऊन जाईल”. त्यांनी म्हटले, “आम्ही अण्वस्त्रधारी देश आहोत. आम्हाला वाटले की आम्ही संपलो, तर आम्ही अर्ध्या जगाला सोबत संपवू.
हे ही वाचा:
खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा निर्णय बँकांचा
आठवीच्या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले!
रॅपर वेदान विरुद्ध लुकआउट नोटीस जारी
पुढील २५ वर्षांची कार्ययोजना सभागृहासमोर मांडणार
नवी दिल्लीतील सूत्रांनी प्रत्युत्तरात म्हटले की, पाकिस्तानच्या या हालचाली केवळ प्रादेशिकच नव्हे तर जागतिक सुरक्षेलाही धोका पोहोचवतात आणि जगभरात पाकिस्तानकडील अण्वस्त्रसाठ्याबाबत चिंता वाढवतात.
सरकारी सूत्रांनी सांगितले, “पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी पुन्हा एकदा अण्वस्त्रांचा उल्लेख करत अत्यंत बेजबाबदार विधान केले आहे. पाकिस्तान प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेला धोका पोहोचवत आहे हे जगाने पाहिले पाहिजे. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असणे ही चिंता व्यक्त करण्यास पुरेशी कारणे आहेत.”
सूत्रांनी पुढे टीका करत म्हटले, पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य नवीन नाही; जेव्हा जेव्हा अमेरिकेकडून पाकिस्तानी लष्कराला समर्थन मिळते, तेव्हा ते आपला खरा चेहरा दाखवतात. त्यांनी पुढे सांगितले, हे स्पष्ट दाखवते की पाकिस्तानमध्ये लोकशाही अस्तित्वात नाही; देशावर लष्कराचे नियंत्रण आहे. पाकिस्तानमधील अण्वस्त्रे नको त्यांच्या हाती लागण्याचा खरा धोका आहे.
