“पाकिस्तानचा स्वतंत्र पुढाकार; आमची अमेरिकेशी थेट चर्चा नाही”

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केले स्पष्ट

“पाकिस्तानचा स्वतंत्र पुढाकार; आमची अमेरिकेशी थेट चर्चा नाही”

इराणने अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारच्या थेट चर्चेला नकार दिला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये केवळ मध्यस्थांच्या माध्यमातून संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. तसेच पाकिस्तानने चर्चेसाठी स्वतःहून पुढाकार घेतला असून त्यात इराण सहभागी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इराणमधील तस्नीम वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने चर्चेची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांनी घातलेल्या अटी अवास्तव आहेत. बघाई म्हणाले की, इराणची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे, तर अमेरिका सातत्याने आपली भूमिका बदलत आहे. इराणने हेही स्पष्ट केले की, “कोणत्या चौकटीत चर्चा करायची याबाबत आम्हाला पूर्ण कल्पना आहे.” अमेरिकन कूटनीतीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, अमेरिकेतच लोक ट्रम्प यांच्या विधानांना किती गांभीर्याने घेतात, यावर विचार करायला हवा.

पाकिस्तानमध्ये झालेल्या बैठकींबाबत इराणने सांगितले की, हा पाकिस्तानचा स्वतःचा उपक्रम आहे आणि तेहरान त्यात सहभागी नाही. मध्यपूर्वेतील देशांनी संघर्ष संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करताना संघर्षाची सुरुवात कोणी केली हेही लक्षात ठेवावे, असे इराणने म्हटले. ट्रम्प यांनी केलेल्या “इराण अमेरिकेच्या प्रस्तावांना सहमत झाला आहे” या दाव्यावर प्रतिक्रिया देताना बघाई म्हणाले की, अमेरिकन अधिकारी काहीही बोलू शकतात, पण इराणने अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा केलेली नाही. त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेसोबत चर्चेसाठी केवळ तृतीय देशांच्या माध्यमातूनच विनंती करण्यात आली होती.

बघाई यांनी स्पष्ट केले की, इराणची भूमिका ठाम आहे—हल्ल्यांविरोधात इराणचे प्रयत्न केवळ स्वसंरक्षणावर केंद्रित आहेत. त्यांनी अमेरिकेच्या दाव्यांवर अविश्वास व्यक्त करत सांगितले की, यापूर्वीही चर्चेच्या आडून अमेरिका हल्ले करून फसवणूक केली आहे.

दरम्यान, इराणच्या संसदाध्यक्ष मोहम्मद बाघेर गालीबाफ यांनीही मोठे विधान केले. त्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा संबंध बाजारातील चढ-उतारांशी जोडला. गुंतवणूकदारांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यांवर लगेच विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, अमेरिकन विधानांमुळे बाजारात अचानक चढ-उतार होत असतील, तर त्या दिशेने न जाता उलट विचार करून निर्णय घेणे अधिक योग्य ठरू शकते. गालीबाफ यांचा इशारा ट्रम्प यांच्या अलीकडील विधानांकडे होता. २२ मार्च रोजी ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे आणि ऊर्जा केंद्रांवरील हल्ले टाळल्याचे म्हटले होते. त्यामुळे बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया उमटली, अमेरिकन शेअर बाजार वाढले आणि तेलाच्या किमती घसरल्या.

हे ही वाचा:

महिला अकाउंटंटचे अपहरण, मारहाण, धमकी प्रकरणात ‘आप’चे उपाध्यक्ष अटकेत

बांगलादेशमध्ये अवामी लीगच्या नेत्यावर गोळीबार

हल्ल्यात जखमी झालेल्या इराणचे नेव्ही कमांडर तंगसीरी यांचा मृत्यू

दोन आमदारांची हत्या करणारा नक्षलवादी सुरेश शरण

मात्र काही दिवसांतच परिस्थिती बदलली. ट्रम्प यांनी पुन्हा कडक भूमिका घेतली, इस्रायलने तेहरानवर हल्ले केले आणि सौदी अरेबियामध्ये ड्रोन अडवण्यात आल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर बाजारात उलट प्रतिक्रिया दिसून आली—शेअर बाजार घसरले आणि तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या.

Exit mobile version