कॅलिफोर्नियात ट्रेकिंगला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

कॅलिफोर्नियात ट्रेकिंगला गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात ट्रेकिंगसाठी गेलेल्या भारतीय वंशाच्या पीएचडी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बरा (UCSB) येथे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करणारा विक्रम मुबयी याचा दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर बिग पाइन लेक्स परिसरात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून, सध्या तरी कोणत्याही गैरकृत्याचे संकेत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

विक्रम मुबयी हा कॅलिफोर्नियाच्या पूर्व सिएरा नेवाडा पर्वतरांगांमधील लोकप्रिय बिग पाइन लेक्स परिसरात एकटाच ट्रेकिंगसाठी गेला होता. १ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क साधला आणि आपल्या जीपीएस लोकेशनची माहिती दिली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटला. नियोजित वेळेत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी इन्यो काउंटी शेरिफ कार्यालयात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच इन्यो काउंटी सर्च अँड रेस्क्यू पथक, कॅलिफोर्निया हायवे पॅट्रोल आणि स्वयंसेवकांनी डोंगराळ भागात व्यापक शोधमोहीम राबवली. अखेर ३ ऑगस्ट रोजी इन्यो नॅशनल फॉरेस्टमधील बिग पाइन लेक्स परिसरात त्याचा मृतदेह सापडला. अधिकाऱ्यांनी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप जाहीर केलेले नाही. तो पाण्यात कसा गेला, याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

मुलांच्या मानसिक आरोग्याशी खेळ महागात; मेटाला ४,७०० कोटींचा दणका

भारताच्या हवाई शक्तीला नवे पंख! ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बनणार ९४ लढाऊ विमाने

‘व्योममित्र’ उघडणार भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेचे दार

तेहलकाचे संपादक तरुण तेजपाल १० वर्षे खडी फोडायला जाणार

विक्रम मुबयी हा यूसीएसबीच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागात पीएचडी करत होता. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली होती. त्याचे संशोधन वनस्पतींचा कचरा आणि प्लास्टिक विघटित करणाऱ्या जीवाणूंच्या सहाय्याने पेट्रोलियम-आधारित पदार्थांना पर्यावरणपूरक पर्याय विकसित करण्यावर केंद्रित होते. तो विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अध्यापन सहाय्यक म्हणूनही कार्यरत होता.

Exit mobile version