तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्करी तळ उडवले!

अफगाण संरक्षण मंत्रालयाने व्हिडीओ प्रसिद्ध करत दिली माहिती

तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्करी तळ उडवले!

पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अफगाणिस्तानने हवाई हल्ल्यांचे फुटेज जारी केले आहे. या फुटेजमध्ये पाकिस्तानी हद्दीत त्यांनी कसे हवाई हल्ले केले हे दाखवण्यात आले आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीचे व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. अफगाणिस्तानचा दावा आहे की, या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला असून सीमेवर तणाव कायम आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये हल्ले केले आहेत. वृत्तानुसार, २०२१ मध्ये तालिबान परतल्यानंतर पाकिस्तानने केलेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे. पाकिस्तानने कंधार आणि काबूलच्या आसपासच्या भागात बॉम्बस्फोट केले.

अशातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांचे पाकिस्तानशी खूप चांगले संबंध आहेत. पाकिस्तानकडे एक उत्तम पंतप्रधान आहेत, एक महान जनरल आहेत. हे दोन लोक आहेत ज्यांचा मी खरोखर आदर करतो आणि मला वाटते की पाकिस्तान खूप चांगले काम करत आहे, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

“पाकिस्तान- अफगाणिस्तान संघर्षात हस्तक्षेप करणार पण…” काय म्हणाले ट्रम्प?

दुबईत रमजानमध्ये भीक मागणाऱ्याकडे होत्या तीन आलिशान गाड्या!

गोवा विशेष: राज्यात उभे राहत आहे २० एकरात लक्झरी रिसॉर्ट

वसई- विरार महापालिकेत आता भाजपचा आवाज घुमणार!

पाकिस्तानने शुक्रवारी म्हटले आहे की अफगाणिस्तानविरुद्ध युद्ध सुरू आहे आणि त्यांच्या सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात २७० हून अधिक तालिबानी सैनिक ठार झाले आहेत आणि ४०० हून अधिक जखमी झाले आहेत. अफगाण तालिबानने सीमापार केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की अफगाण सैन्याने ५५ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आणि पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केला.

Exit mobile version