“भारतासोबत समस्या आहे कारण…” मुहम्मद युनूस भारताबद्दल पुन्हा बरळले

भारत आणि बांगलादेश यांचे संबंध ताणले गेले आहेत

“भारतासोबत समस्या आहे कारण…” मुहम्मद युनूस भारताबद्दल पुन्हा बरळले

बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर मुहम्मद युनूस यांनी सरकारची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून भारत आणि बांगलादेश यांचे संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी सतत भारतविरोधी विधाने करून संबंध अधिक बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. युनूस यांच्या कारकिर्दीत हिंदूंवर मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. आता पुन्हा त्यांनी अमेरिकेतील मंचावरून भारतासोबत समस्या असल्याचे उघड विधान केले आहे.

अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा उल्लेख करत म्हटले की, त्यांच्या भारतात राहण्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. पुन्हा एकदा विष ओकताना त्यांनी म्हटले की, बांगलादेशला भारताशी समस्या आहे कारण गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवण्यासाठी झालेल्या निदर्शनांना भारताने पसंत केले नाही. बंडानंतर हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या. तेव्हापासून त्या येथे राहत आहेत. युनूस यांनी अनेक वेळा भारत सरकारला हसीनाला त्यांच्या स्वाधीन करण्याची विनंती केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान दिलेल्या मुलाखतीत युनूस म्हणाले, “सध्या भारताविरुद्ध समस्या आहे कारण ते माजी पंतप्रधान हसीना यांना आश्रय देत आहेत, ज्यांनी या सर्व समस्या निर्माण केल्या आणि तरुणांना मारले. यामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये खूप तणाव निर्माण झाला आहे.” भारताचा उल्लेख करताना ते म्हणाले, “याव्यतिरिक्त, दुसऱ्या बाजूने अनेक खोट्या बातम्या येत आहेत, ज्यामध्ये सर्व प्रकारचे प्रचार पसरवले जात आहेत की ही एक इस्लामिक चळवळ आहे ज्याने बांगलादेशवर कब्जा केला आहे. ते म्हणतात की मी देखील तालिबान आहे.”

हेही वाचा..

मिग- २१ ला निरोप; ऐतिहासिक फ्लायपास्टमध्ये पायलट असलेल्या स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा कोण आहेत?

भाजप शेतकरी, गरजूंसोबत ठामपणे उभा

बिहार कधीच काँग्रेसची प्राधान्यक्रमात नव्हती

विहिरीत पडले दोन हत्ती

२२ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) ८० व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी न्यू यॉर्कमध्ये पोहोचल्यावर मुहम्मद युनूस यांना निदर्शनांचा सामना करावा लागला. शेख हसीनाच्या अवामी लीग पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर युनूस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. गेल्या ऑगस्टमध्ये तरुणांच्या निषेधानंतर शेख हसीनांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. विद्यार्थी अनेक दिवस रस्त्यावर उतरले आणि ऑगस्टच्या सुरुवातीला निदर्शने तीव्र झाली.

Exit mobile version