दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पाक सैन्य अधिकारी होते उपस्थित!

भारताने थेट नावे केली जाहीर

दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पाक सैन्य अधिकारी होते उपस्थित!

पहलगाम दहशतवादी हल्याचा बदला भारताने ‘ऑपरेशन सिंधू’ राबवत घेतला. या अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यात सुमारे १०० दहशतवादी मारले गेले. यानंतर या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. यात पाकिस्तान सैन्याचे काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिल्याची बाब उघडकीस आली होती. भारताने याचे फोटो जगभरात दाखवून पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड केला होता. यानंतर आता भारताने थेट त्या अधिकाऱ्यांची नावेच जाहीर केली आहेत.

भारताच्या अचूक हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या लोकांमध्ये पाकिस्तानचे उच्च अधिकारी होते ही बाब जगजाहीर झाली आहे. यानंतर भारताने रविवारी अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांची नावेचं थेट जाहीर केली.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बहावलपूरच्या मुरीदके येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यात पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. पाकिस्तानच्या पंजाबमधील पोलिस महानिरीक्षक देखील अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचे दिसून आले. लेफ्टनंट जनरल फय्याज हुसैन शाह, लाहोरच्या IV कॉर्प्सचे कमांडर, लाहोरच्या ११ व्या पायदळ विभागाचे मेजर जनरल राव इम्रान सरताज, ब्रिगेडियर मोहम्मद फुरकान शब्बीर, पंजाब पोलिस महानिरीक्षक डॉ. उस्मान अन्वर, मलिक सोहेब अहमद भेर्थ, पंजाब प्रांतीय असेंब्लीचे सदस्य उपस्थित होते.

पाकिस्तानने बऱ्याच काळापासून असा दावा केला आहे की, ते कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आश्रय देत नाही किंवा त्याचे समर्थन करत नाही, परंतु भारतीय सशस्त्र दलांनी शेअर केलेल्या प्रतिमांनुसार, अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. त्यामुळे पाकिस्तानचा हा दावा फोल ठरला आहे.

हे ही वाचा : 

ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले, पाकचे ३५-४० सैनिक मृत्यूमुखी, पाकची जेटही पाडली!

भारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!

पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!

मला अभिमान आहे, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन!

लाहोरजवळील मुरीदके येथील दहशतवादी छावणीवर भारतीय हल्ल्यात ठार झालेल्या तीन जणांच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा दहशतवादी हाफिज अब्दुल रौफने केले. हाफिज सईदने स्थापन केलेल्या बंदी घातलेल्या जमात-उद-दावा (जेयूडी) चे सदस्य देखील उपस्थित होते. मारले गेलेले कारी अब्दुल मलिक, खालिद आणि मुदस्सीर हे जमात-उद-दावाचे सदस्य असल्याचे वृत्त आहे. अंत्यसंस्कारानंतर पाकिस्तानी लष्कराचे जवान दहशतवाद्यांच्या शवपेटी पाकिस्तानच्या ध्वजात गुंडाळून घेऊन जाताना दिसत होते. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला पोसतो यावरून पाकिस्तानवर जगभरातून टीका करण्यात आली.

Exit mobile version