युएईमध्ये झळकला तिरंगा

युएईमध्ये झळकला तिरंगा

भारत कोविडच्या दुसऱ्या लाटेला अत्यंत हिंमतीनो तोंड देत असताना, जगातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. फ्रान्स, इराण, सिंगापूर, जर्मनी पाठोपाठ युएई मधील अबु धाबी आणि दुबई या देशांनी देखील भारताला हिंमत ठेवण्यास सांगितले आहे. त्याबरोबरच भारताला असलेला पाठिंबा दर्शवण्यासाठी दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती. अबु धाबीतील एका इमारतीला देखील तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती. याबाबत भारताच्या दूतावासांनी ट्वीट केले होते.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

पंडित राजन मिश्र यांचे निधन

अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल

सौदी अरेबियाने दिला भारताला ८० टन ऑक्सिजन

भारताच्या दूतावासांसोबतच बुर्ज खलिफाच्या ट्विटर वरून देखील ट्वीट करण्यात आले होते. बुर्ज खलिफाच्या तिरंग्यातील रोषणाई सोबत त्यांनी एक संदेश देखील लिहीला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे,

भारताला आणि त्याच्या नागरिकांच्या पाठीशी या कठिण काळात आमच्या आशा, प्रार्थना आणि सहकार्य देत आहोत. या आव्हानात्मक काळात भारत हिंमत ठेव

जगातील विविध देशांकडून भारताला सहकार्य देण्यात आले आहे. सौदी अरेबिया, सिंगापू येथून द्रवरूप ऑक्सिजनचे टँकर प्राप्त झाले. जर्मनीहून द्रवरूप ऑक्सिजन बनवण्याची यंत्रणा प्राप्त झाली आहे. त्याबरोबरच अमेरिकेने देखील अखेरीस लस बनवण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल द्यायला प्रारंभ केला आहे. त्यामुळे भारताचे लस उत्पादन पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version