ट्रम्प यांचा स्वतःची पाठ थोपटण्याचा विक्रम!

१० महिन्यात ८ युद्धे थांबवल्याचा दावा

ट्रम्प यांचा स्वतःची पाठ थोपटण्याचा विक्रम!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा “१० महिन्यांत आठ युद्धे” थांबवल्याबद्दल स्वतःला श्रेय दिले आहे. तसेच यामागील कारण म्हणजे टॅरिफ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितले की ‘टॅरिफ’ हा त्यांचा इंग्रजी भाषेतील आवडता शब्द आहे.

ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले की, “मी अमेरिकन ताकद पुनर्संचयित केली आहे. १० महिन्यांत आठ युद्धे संपवली आहेत, इराणचा अणु धोका नष्ट केला आहे आणि गाझामधील युद्ध संपवले आहे. ३,००० वर्षांत प्रथमच शांतता प्रस्थापित केली आहे. तसेच जिवंत आणि मृत अशा दोन्ही प्रकारच्या ओलिसांची सुटका केली आहे.” त्यांच्या प्रशासनाचा २०२६ चा अजेंडा सादर करताना ट्रम्प यांनी हे दावे केले आहेत.

“टॅरिफमुळे आम्ही कोणाच्याही विचारापेक्षा खूप जास्त पैसे कमावले आणि विधेयकाने आम्हाला मदत केली,” असे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी या वर्षाच्या सुरुवातीला पारित केलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख कर कपात कायद्याचा संदर्भ देत म्हटले. बायडेन आणि माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी महागाईचा आधार घेत दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शर्यत जिंकली. तथापि, आता ते स्वतः अमेरिकन लोकांना देशाची अर्थव्यवस्था भरभराटीला येत आहे हे पटवून देण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते. तथापि, त्यांच्या भाषणादरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी परिस्थितीचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्याऐवजी, त्यांनी बायडन आणि त्यापूर्वीच्या डेमोक्रॅट राजवटीला अपयशासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. “जेव्हा मी पदभार स्वीकारला तेव्हा मला एक गोंधळ वारशाने मिळाला आणि मी तो दुरुस्त करत आहे,” असे म्हणत ट्रम्प यांनी बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात इमिग्रेशन, महागाई आणि संस्कृतीच्या समस्यांचा उल्लेख केला.

हेही वाचा..

कदंबा नौदल तळाजवळ आढळला जीपीएस बसवलेला ‘सीगल’; संशोधन की हेरगिरी?

माणिकराव कोकाटेंकडील सर्व खाती काढून घेतली

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ घडवणारे शिल्पकार राम सुतार यांचे निधन

‘इजू बाई’ ठरल्या देशाचा अभिमान

ट्रम्प हे सातत्याने युद्धे थांबवल्याचा दावा करत असून त्यांच्या कामगिरीचे पुरेसे श्रेय मिळत नसल्याची तक्रार करत असतात. मे महिन्यातील संघर्षादरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यासाठी त्यांनी शुल्क आणि व्यापार धोरणाच्या धमकीचा वापर केल्याचा दावा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेक वेळा केला आहे. नवी दिल्लीने हा दावा फेटाळला असून पाकिस्तानने युद्धबंदीमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाला श्रेय दिले आहे.

Exit mobile version