आरोग्याच्या वाटेवरची पहिली पायरी – वज्रासन

आरोग्याच्या वाटेवरची पहिली पायरी – वज्रासन

वज्रासन हे एक सोपं आणि प्रभावी योगासन आहे, तो कोणीही सहज करू शकतो. दिसायला अगदी साधं, पण फायदे मात्र खोल आणि आरोग्यदायी. रोज फक्त ५ ते १० मिनिटं वज्रासन केल्याने शरीराच्या अनेक तक्रारी दूर होतात. पचनसंस्था सुधारते, मानसिक तणाव कमी होतो आणि विशेषतः वजन घटवण्यास मदत होते.

वज्रासनाचे आरोग्यदायी फायदे:
👉 पचन सुधारते – जेवल्यानंतर वज्रासन केल्याने अन्न पटकन पचते
👉 वजन कमी होण्यास मदत – विशेषतः पोट आणि मांड्यांची चरबी घटते
👉 रक्तप्रवाह सुधारतो – साइटिका, गॅस, अपचन यांपासून आराम
👉 ब्लड प्रेशर नियंत्रणात – तणाव कमी होतो, मन शांत राहतं
👉 पाठदुखी आणि गुडघेदुखीपासून सुटका
👉 फुफ्फुसं बळकट होतात – श्वासोच्छ्वास सुधारतो
👉 लवचिकता वाढते – स्नायूंना आराम मिळतो
👉 मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त

कसं करायचं वज्रासन?

  1. गुडघ्यांवर बसावं

  2. पाठीला सरळ ठेवावं

  3. पायाची बोटं जमिनीवर, टाचा वर

  4. डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित करावं

  5. ही मुद्रा ५-१० मिनिटं टिकवावी

टीप: जेवल्यानंतर ५ मिनिटं वज्रासन केल्यास पचन सुधारतं, अन्न हलकं वाटतं आणि शरीर आरोग्यदायी बनतं.

Exit mobile version