राहुल गांधींच्या यात्रेची हवा सुरुवातीलाच निघून गेली!

बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांची टीका 

राहुल गांधींच्या यात्रेची हवा सुरुवातीलाच निघून गेली!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधून “मतदान हक्क यात्रा” (वोटर अधिकार यात्रा) सुरू केली आहे. १७ ऑगस्ट पासून सुरु झालेली ही यात्रा त्यांनी निवडणूक यादीतील विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेतील अनियमिततांविरोधात आणि मतांची चोरी (vote chori) रोखण्यासाठी सुरू केली आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या या यात्रेवरून बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी टीका केली आहे. त्यांच्या यात्रेची हवा सुरुवातीलाच निघून गेली असल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे. 

एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, ”राहुल गांधींच्या यात्रेची हवा सुरुवातीलाच निघून गेली आहे. बिहारच्या जनतेने राहुल गांधींना स्पष्ट संदेश दिला आहे की, येथे मतदारांचे मतदान चोरण्याचा अधिकार कोणालाही नाही, आणि कोणीही तसे करू शकणार नाही. बिहारची जनता जागरूक आहे, म्हणूनच त्यांनी राहुल गांधींच्या प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले आहे, कारण त्यांना माहीत आहे की सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करतील.

दरम्यान, राहुल गांधी यांनी बिहारमधील गया येथे एका सभेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यावर हल्ला चढवला होता. तसेच इंडी आघाडीचे सरकार आल्यानंतर या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशी धमकी त्यांनी दिली होती.

हे ही वाचा : 

कर्नाटक धर्मस्थळ वाद : काय म्हणाले सी.टी. रवी ?

बेरोजगारी दर घसरून ५.२ टक्क्यांवर

पंतप्रधान मोदी यांनी सी.पी. राधाकृष्णन यांची एनडीए खासदारांशी करून दिली ओळख

भारतातून आय फोनची निर्यात ६३ टक्क्यांनी वाढली

यावर भाष्य करताना दिलीप जयस्वाल म्हणाले, ‘आमचे सरकार आले तर बघून घेऊ’ अशा प्रकारचा इशारा देणे ही अतिशय हलक्या दर्जाची वक्तव्ये आहेत…”. अशा प्रकारची धमकी देणे चुकीचे आहे. त्याऐवजी त्यांनी जनतेसमोर जावे आणि जनतेकडून निर्णय करून घ्यावा. मात्र, जनतेलाही आता सर्व माहिती आहे कि निवडणूक आयोग कोणत्याही मतदाराच्या मतदानाचा गैरवापर करत नाही.

 

 

Exit mobile version