केरळमध्ये भाजपाची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच ३ जागा जिंकल्या

राजीव चंद्रशेखर, बी. बी. गोपाकुमार आणि व्ही. मुरलीधरन ठरले विजयी

केरळमध्ये भाजपाची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच ३ जागा जिंकल्या

केरळमधील विधानसभा निवडणुकीतील एकमेव विजयानंतर दहा वर्षांनी, भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा एकदा राज्य विधानसभेत आपले अस्तिव प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने केरळमध्ये बाजी मारत डाव्या सरकारला सत्तेतून बाहेर काढले आहे. अशातच भाजपने आपल्या जागांची संख्या ० वरून ३ पर्यंत वाढवली आहे. पक्षाने तिरुवनंतपुरममधील नेमोम आणि कझाकोट्टम, तसेच कोल्लममधील चथनूर येथून विजय मिळवला आहे.

२०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने नेमोम, कझक्कूट्टम आणि चथनूर या तीन जागा जिंकून उल्लेखनीय यश मिळवले, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने राज्यात सत्ता काबीज केली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तिरुवनंतपुरममधील नेमोम या मतदारसंघात विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ केरळमधील पक्षाचा सर्वात मजबूत बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते आणि मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांचा ३,५९० मतांनी पराभव केला, तर काँग्रेसचे तरुण नेते के. एस. शबरीनाथन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

हे ही वाचा:

तामिळनाडूमधील कोलाथूरमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन पराभूत

भारत- श्रीलंकेतील सागरी सहकार्य बळकटीकरणासाठी INS Sindhukesari कोलंबोत

विजय यांच्या समर्थकाने अफवा ऐकून गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न

जर्मनीतील अमेरिकन सैन्य कपात वाढणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा संकेत

कझक्कूट्टममध्ये आणखी एक माजी केंद्रीय मंत्री, व्ही. मुरलीधरन, हे देखील विजयी झाले, ज्यामुळे तिरुवनंतपुरम प्रदेशात भाजपला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. दरम्यान, चथनूरमध्ये भाजपचे उमेदवार बी. बी. गोपाकुमार यांनी अटीतटीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून जागा जिंकली. गेली १२ वर्षे राष्ट्रीय सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे या दक्षिण भारतीय राज्यात अस्तित्व जवळजवळ नव्हतेच. २०१६ मध्ये नेमोममधून जिंकलेली एकमेव विधानसभा जागा २०२१ च्या निवडणुकीत पूर्णपणे गमावली गेली.

Exit mobile version