मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्षाचे उमेदवार जाहीर होत असून त्यानुसार हे उमेदवार आता अर्ज भरत आहेत. भाजपच्या ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवारांनीही अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यासाठी शंखनाद करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
भारत २०३० पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल
हिवाळ्यात कानांची काळजी घेणे का आवश्यक आहे?
सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोनचा मान आयफोन १६ ला
निवडणूक ड्युटीवर असलेल्या महापालिका अधिकाऱ्यावर हल्ला
वॉर्ड क्रमांक २४ मधुन महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजपाच्या स्वाती संजय जैस्वाल यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत जयस्वाल यांनी अर्ज भरला. आमदार भातखळकर यांनी स्वाती जयस्वाल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
