“एकटे देवेंद्र पुरेसे आहेत”

“एकटे देवेंद्र पुरेसे आहेत”

‘एकटा देवेंद्र काय करणार’ असा प्रश्न पडलेल्यांना गेल्या दोन दिवसात लक्षात आले असेल, आमचे नेते देवेन्द्रजी एकटेही यांना पुरेसे आहेत. असे ट्विट करत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी ‘एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा?’ असे विधान केले होते. गेल्या दोन दिवसात विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे ठाकरे सरकारची चौफेर फटकेबाजी केली त्या पार्श्वभूमीवरच भातखळकरांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”

फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मिळाव्यात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे असं म्हणाल्या होत्या की, “एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा?” शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला फडणवीसांनी दिला असल्याचं सांगत त्यांनी फडणवीसांवर हल्ला केला होता. परंतु कालपासून विधानसभेत आणि सभागृहाबाहेरही फडणवीस ज्या पद्धतीने ठाकरे सरकारची लक्तरं काढत आहेत ती पाहून ‘देवेंद्र फडणवीस अकेलाभी काफी है।” असं म्हणायची वेळ सरकारवर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस अनेक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले आहे. पूजा चव्हाण आणि संजय राठोड प्रकरण, धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरण शिवाय राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेहबूब शेखवर केला गेलेला बलात्काराचा आरोप या सगळ्या गोष्टींवरून फडणवीसांनी टीकेचा भडीमार केला आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी, ” सरकारने कोविड-१९ च्या काळातही भ्रष्टाचार केला आहे. या सरकारने, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात याचा अर्थ समजावून सांगितला आहे.” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

Exit mobile version