मुंब्रा घटनेनंतर सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्यात येणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंब्रा घटनेनंतर सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्यात येणार!

कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे रेल्वेच्या कारभारावर तसेच मुंबईतील गर्दीच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. लोकांमध्ये संताप आहे. या परिस्थितीत सरकार कोणता तोडगा काढणार असा सवाल उपस्थित केला जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उपाय सांगितला आहे.

मुंब्रा स्थानकाजवळ एका वळणावर दोन रेल्वेगाड्या एकमेकांच्या अगदी जवळून जातात, तिथे रेल्वेच्या दारात उभ्या असलेल्या लोकांच्या बॅग एकमेकांना घासल्यामुळे या दोन रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान काही लोक पडले. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, कालची घटना गंभीर आहे. मेट्रोचा विस्तार कमी असल्यामुळे लोकलमधील गर्दी जास्त आहे. लोकलला दरवाजे लावले तर व्हेंटिलेशनची व्यवस्था करावी लागेल हे सरकारला माहिती आहे. त्यामुळे भाडं न वाढवता एसी ट्रेन देण्याविषयी केंद्र सरकार विचार करत आहे.

हे ही वाचा:

‘रीमेक’ चित्रपटांबाबत आनंद पंडित यांचे काय मत?

एसआयपी इनफ्लो मे मध्ये ऑल-टाइम हाय

स्वित्झर्लंडमध्ये पियुष गोयल यांची प्रमुख उद्योगपतींची भेट

हिंदू धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी : वजाहत खानला अटक

पुढे बोलताना फडणवीसांनी सांगितले की, ‘आगामी काळात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मात्र खाजगी कार्यालयांमध्ये ते करणं थोडं कठीण आहे. कारण यामुळे कंपन्यांच्या नफा-तोट्यावर परिणाम होतो. मात्र आगामी काळात याबाबत निर्णय होऊ शकतो.’

मुंब्रा लोकल अपघातात १३ जण जखमी झाले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमी कळवा छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे सिविल रुग्णालय आणि ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Exit mobile version