औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगरच…मंत्री मेघना बोर्डीकरांनी सुनावले!

औरंगाबाद नाही, छत्रपती संभाजीनगरच…मंत्री मेघना बोर्डीकरांनी सुनावले!

औरंगाबाद या शहराचे नाव अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर करण्यात आले असले तरी अद्याप काही लोकांना ते मान्य नाही. ते औरंगाबादच असावे अशी त्यांची इच्छा आहे. मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनीही हे नाव औरंगाबादच असावे अशी मागणी भाषणातून केली होती. पण या सगळ्या भूमिकांवर मंत्री मेघना बोर्डीकरांनी परभणीत घेतलेल्या भूमिकेचे सध्या कौतुक होते आहे.

हे ही वाचा:

लष्करी उपग्रहांसाठी खासगी सहभाग गरजेचा

आत्मनिर्भर भारताला बुस्ट! बुलेट ट्रेनचे कोच देशातच होणार विकसित

पश्चिम बंगाल: ७९ कच्चे बॉम्ब सापडल्याचे प्रकरण एनआयएकडे

पहिले होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, अणुचर्चा नंतर!

मेघना बोर्डीकर या परभणीच्या पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून तिथे एका फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोर्डीकर म्हणाल्या की, या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा संघ विजयी ठऱला असून त्यांचे अभिनंदन. बोर्डीकर यांनी संभाजीनगर असे नाव घेताच मैदानातील उपस्थितांनी औरंगाबाद…औरंगाबाद असा ओरडा करायला सुरुवात केली. याचसंदर्भातील एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात छत्रपती संभाजीनगरऐवजी औरंगाबाद नावाचा पुकारा उपस्थित लोक करताना दिसतात.

पण मेघना बोर्डीकर यांनी गप्प न राहता त्या उपस्थितांना सुनावले. त्या म्हणाल्या की, औरंगाबाद या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे आणि अधिकृतपणे हे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्यांना या नावाची आता सवय करावी लागेल.

 

Exit mobile version