नेहरू, इंदिरा गांधींना भारताची लोकसंख्या ही समस्या वाटत होती!

नेहरू, इंदिरा गांधींना भारताची लोकसंख्या ही समस्या वाटत होती!

New Delhi: Prime Minister Narendra Modi speaks during his reply to the Motion of Thanks to the President’s Address in the Rajya Sabha during the Budget Session of Parliament in New Delhi on Thursday, February 5, 2026. (Photo: IANS/Video Grab/Sansad TV)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत गुरुवारी केलेल्या भाषणात काँग्रेसच्या कामाच्या पद्धतीवर खरपूस टीका केली. अपमान करणे हे काँग्रेसच्या संस्कृतीत आहे, अशी टीका करताना मोदींनी सभागृहात काँग्रेस आणि विरोधकांनी जो गोंधळ घातला त्यावरही शरसंधान केले.

मोदी म्हणाले की, भाजपा एनडीए असो आमची आणि काँग्रेसची विचार करण्याची पद्धत यात मोठा फरक आहे. आमचा विचार आहे की, १४० कोटी देशवासीय इतके सामर्थ्यवान आहेत की, ते आव्हान पेलतील यावर आमचा विश्वास आहे. पण काँग्रेस देशवासियांनाच समस्या मानतात. मोदींनी जुनी घटना सांगितली. ते म्हणाले की, इंदिरा गांधी एकदा इराणला गेल्या होत्या. तिथे भाषण देत होत्या. त्यात त्यांनी नेहरूंसोबत झालेल्या वक्तव्यांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, जेव्हा कुणीतरी माझ्या वडिलांना विचारले त्यांच्यासमोर किती समस्या आहेत तर त्यांनी उत्तर दिले ३५ कोटी. तेव्हा आपली लोकसंख्य़ा ३५ कोटी होती. ३५ कोटी लोक हे नेहरूंना समस्या वाटत होते. त्या म्हणाल्या आज लोकसंख्या ५७ कोटी आहे. म्हणून माझ्यापुढे असलेल्या समस्य़ाही तेवढया मोठ्या आहेत. आपल्या देशवासियांना कुणी समस्या मानू शकेल असे होईल तरी काय?

मोदींनी पुढे सांगितले की, नेहरू, इंदिरा काँग्रेसची बिरादरी भारताच्या लोकांना समस्या मानतात. पण आव्हाने किती असो १४० कोटी उत्तरे आमच्याकडे आहेत. हे १४० कोटी लोक भारताच्या भविष्याचे निर्माते आहेत आम्ही त्यांना समस्या मानत नाही.

हे ही वाचा:

“भारत बनला आहे दक्षिण जगताचा आवाज”

एक ब्रिटिश नागरिक पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह का लिहीतो, याची चौकशी करायचीय!

दुकानदाराकडून लाच घेताना पालिका अधिकाऱ्यांना पकडले

२००४ नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपतींचे अभिभाषण पंतप्रधानांच्या उत्तराशिवाय मंजूर

मोदींनी सभागृहात काँग्रेस आणि विरोधकांनी कसा अपमान केला यावरही भर दिला. ते म्हणाले की, देशाच्या लोकांचा अपमान करणे हे काँग्रेसच्या संस्कारात आहे. राष्ट्रपतींचा अपमान त्यांनी केला. निवडणुका झाल्यावर त्यांनी जे शब्द राष्ट्रपतींसाठी काढले हे असे कसे लोक आहेत जे राष्ट्रपतींबद्दल अपशब्द वापरतात. लोकसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली नाही. हा राष्ट्रपतीपदाचा घोर अपमान आहे. त्यांना संविधान हा शब्द बोलण्याचाही अधिकार नाही. राष्ट्रपती या गरीब समाजातून आलेल्या महिला आहेत, आदिवासी समाजातून आलेल्या आहेत. त्यामुळे हा महिलेचा,  आदिवासी समाजाचा, सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या महिलेचा अपमान केला.

ते पुढे म्हणाले की,  लोकसभेतील घटना हृदयद्रावक आहे. विरोधकांची हताशा, निराशा समजू शकतो पण यासाठी देशाच्या पवित्र मंदिरालाच पणाला लावले गेले.  ज्यावेळी चेअरवर आसामचेच सदस्य बससले होते. त्यांच्या दिशेने कागद फेकले गेले. हा आसामच्या नागरिकांचा अपमान नाही का?  आंध्रातील दलित परिवाराचा पुत्र चेअरवर होता. त्यांचाही अपमान केला गेला. सभागृहाने त्यांना जबाबदारी दिली आहे. ते दलित समाजाकडून आहेत म्हणून त्यांचा अपमान करता. आता असे वाटते की, काँग्रेसच्या लोकांना आसामच्या लोकांप्रती चीड आहे.

Exit mobile version