“फक्त फोटो दाखवून विकास होत नाही…”

आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे जोरदार प्रत्युत्तर

“फक्त फोटो दाखवून विकास होत नाही…”

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करत काही छायाचित्रे दाखवली. मात्र या टीकेला सडेतोड उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विकासकामांचा सविस्तर इतिहास मांडत वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दीर्घकालीन दृष्टीने निर्णायक ठरणारा कोस्टल रोड प्रकल्प भाजप सरकारच्या काळातच ठोस गतीने पुढे गेला. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पर्यावरणीय मंजुरी, न्यायालयीन अडथळे, तांत्रिक अडचणी आणि विविध प्रशासकीय टप्प्यांवर भाजप सरकारने ठाम भूमिका घेत निर्णय घेतले. “फक्त फोटो दाखवून विकास होत नाही. विकासासाठी निर्णयक्षमता, इच्छाशक्ती आणि सातत्य आवश्यक असते,” असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली.
हे ही वाचा:
‘संक्रमण काळात’ मोदी जाणार नव्या कार्यालयात

ग्रीन हायड्रोजनमध्ये नवा मेगा प्रकल्प गेम चेंजर ठरेल

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आवाज महत्त्वाचा

भारतीय ग्रंथपरंपरेत शिक्षणाला समाज, नैतिक जीवनाच्या केंद्रस्थानी स्थान

मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, भाजपने रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधांसाठी दीर्घकालीन आराखड्याच्या आधारे काम केले आहे. या सर्व प्रकल्पांचा थेट फायदा सामान्य मुंबईकरांना होणार असून, शहराची वाहतूक कोंडी कमी करणे, वेळ व इंधन बचत करणे आणि आर्थिक गती वाढवणे हे भाजपचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवाजी पार्क येथूनच विकासाचा लेखाजोखा मांडत फडणवीस यांनी मुंबईच्या प्रगतीसाठी भाजपच सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय असल्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणूक ही आरोप-प्रत्यारोपांवर नव्हे, तर विकास, पारदर्शकता आणि मजबूत नेतृत्वाच्या मुद्द्यावरच लढवली जाईल, असा ठाम दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Exit mobile version