औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असे बदलण्यात आल्यानंतरही अजून तेथील महानगरपालिकेतील एमआयएमचे नगरसेवक या शहराला औरंगाबाद म्हणत असल्याचे दिसत आहे. मात्र या महानगरपालिकेतील भाजपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अनिल मकरिये यांनी अशा एका नगरसेवकाला झापले.
स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएमच्या नगरसेवकाने छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद असा उल्लेख केला होता. पण त्याला मकरिये यांनी तात्काळ रोखले. याचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून शेवटी या नगरसेवकाने आपले शब्द मागे घेतले.
औरंगाबाद म्हणणाऱ्या mim च्या नगरसेवकाला भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांनी दिलेला दम बघा
नगरसेवक लगेच ताळ्यावर आला
उबाठा वाले असे बोलू शकले असते का ?
यासाठी भाजप पाहिजे..🌷✌️ pic.twitter.com/gJ7DXSn9cv— बैरिस्टर चढ्ढा (घटस्फोट विशेषज्ञ )…😎📚 (Parody) (@rana_indrjeet) April 5, 2026
एमआयएमच्या या नगरसेवकाने औरंगाबाद असा उल्लेख केल्यावर मकरिये यांनी बजावले की छत्रपती संभाजीनगर असाच उल्लेख करा नाहीतर तुमचे एकही काम होणार नाही, एक रुपयाही मिळणार नाही. चुकीचे नाव घेत जाऊ नका, असेही मकरिये म्हणाले. त्यावर त्या नगरसेवकाने आपले शब्द मागे घेत छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला.
हे ही वाचा:
७ वर्षांनंतर भारताची इराणकडून पहिली तेल खरेदी
अमेरिकन विमानातील दुसऱ्या पायलटलाही वाचवले
उत्तर भारतातील नवं कनेक्टिव्हिटी हब: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
.5 फ्रंटवर परिस्थिती चिंताजनक |
यावर एमआयएमचा आणखी एक नगरसेवक म्हणाला की, औरंगाबाद हे ऐतिहासिक नाव आहे, हे घेण्यास काय हरकत आहे. मात्र तो वाद आणखी वाढला नाही. अर्थसंकल्पावर आपण चर्चा करत असून त्यावर प्रथम बोलूया असे म्हणत बाकी नगरसेवकांनी विषयाला लगाम घातला.
औरंगाबाद या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात यावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआचे सरकार आल्यानंतर ही घोषणा ते सरकार पडण्यापूर्वी घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली होती. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद या नावांवरून एमआयएम आणि भाजपा नगरसेवकांमध्ये खटकेही उडतात. या महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याबद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला पण त्यावेळी एमआयएमच्या नगरसेवकांनी सभात्याग करत या ठरावाचा निषेध केला होता.
