उबाठाचे निष्ठावान दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

अन्याय झाल्याचे सांगत केला प्रवेश

उबाठाचे निष्ठावान दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

मुलीला तिकीट दिलं नाही, पण पक्षाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. म्हातारं झाल्यामुळे पक्षाला आपली गरज संपली, अशी वेदना व्यक्त करत उबाठा शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतल्याचं दगडू सकपाळ म्हणाले. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभेतील प्रभाग क्र. २०३ मधून इच्छुक होत्या. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळेच दगडू सकपाळ नाराज होते. त्यानंतर ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असे बोलले जात होते. अखेर रविवारी ते स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

कमळाच्या बिया म्हणजे पौष्टिक सुपरफूड! रोजच्या आहारात समाविष्ट कराचं

नैसर्गिक प्रकाश मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर

हवाई अपघात टाळण्यासाठी एएआयबीने काय केली शिफारस ?

सुळे–पवार एकत्र आल्याने संभ्रम

दगडू सकपाळ म्हणजे कणखर नेतृत्व असं म्हणत एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं. तर गेला की तो कचरा अशा प्रकारचं बदनामी करून काही लोक मोकळे होतात. बाळासाहेब दगडूदादांना सवंगडी समजायचे, पण काही लोक आता घरगडी समजायला लागले आहेत. घाटकोपरच्या सभेमध्ये दगडूदादांनी सांगितलं होतं, एकनाथ शिंदे एक दिवस नक्की मोठा होईल. मी शाखाप्रमुखपासून मुख्यमंत्री झालो, अशी आठवणही एकनाथ शिंदे यांनी सांगितली.

दगडू सकपाळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आजचा दिवस शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दगडू सकपाळ हे बाळासाहेबांचे कट्टर आणि निष्टावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, कडवट कार्यकर्त्यांचा विचारही उबाठा गटात केला जात नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला. दगडू सकपाळ यांनी लालबागमध्ये शिवसेना वाढवली. आता लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाचा आर्शीवाद मिळाला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

दोन दिवसापूर्वी, मध्यरात्री दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. त्यानंतर दगडू सकपाळांनी शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले होते.

Exit mobile version